Film Haq: चित्रपट आणि त्यांचे वाद काही नवीन नाही; असाच एक चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे दिसून येत आहे. अभिनेता इमरान हाशमी (emraan hashmi)आणि अभिनेत्री यामी गौतम(yami-gautam) यांचा आगामी ‘हक’(Haq) चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटावर शाह बानो यांची मुलगी सिद्दीका बेगमने हीन आरोप केल्याची मालिका सध्या सुरु आहे. चित्रपट निर्मात्यांनी परवानगी न घेता त्यांच्या कुटुंबाच्या कथेनुसार हा चित्रपट तयार केला आहे. तसेच तिने वकील जेड वारसी द्वारा यासंदर्भात कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
या आधी भारतीय न्यायपालिकेच्या इतिहासात शाहबानो हा खटला चांगलाच प्रसिद्ध होता. या खटल्यातील निकालानंतर भारतीय समाजकारण, राजकारणाची दिशा चांगलीच बदलली होती. हा खटला मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाहबानो यांच्यातील पोटगीसाठी होता. याच खटल्यावर ‘हक’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. याचे दिग्दर्शन सुपर्ण वर्मान यांनी केले आहे. या चित्रपटात इमरान हाशमी आणि यामी गौतम हे महत्वाची भूमिका साकारत आहेत. चित्रपटाचे पोस्टर आणि पहिला लूक नुकतेच प्रदर्शित झाले असून त्यानंतरच वादाला सुरवात झाली.
शाहबानोच्या मुलीने यावर प्रश्न उठवला आहे. तिच्या मते, हक चित्रपटात त्यांच्या आईच्या खऱ्या आयुष्याशी काही खाजगी घटना दाखवल्या आहेत, पण त्यासाठी कोणतीही संमती यांनी घेतलेली नाही. यामुळे तिने सिद्दीका बेगम यांनी निर्माता सुपर्ण वर्मा, प्रोडक्शन पार्टनर जंगली पिक्चर्स, बावेजा स्टुडियोज आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन यांना नोटीस पाठवली.नोटिसमध्ये चित्रपटाचे रिलीज, प्रमोशन आणि स्क्रीनिंग स्थगित करण्याची मागणी देखील तिने केली आहे. हा चित्रपट ७ नोव्हेंबरला चित्रपट गृहात प्रदर्शित होण्याच्या चर्चा देखील होत्या.
हे देखील वाचा –
Yogesh Kadam News: योगेश कदमांनी अखेर मौन सोडलं; विरोधकांना सुनावले खडे बोल..