Jain Community: कोर्टाच्या आदेशानुसार मुंबईतील कबूतर खाने हे बंद झाल्याच दिसून येत आहे. कबूतर खाने(pigeon) पुन्हा पूर्वरत व्हावे अशी मागणी काहीजण वारंवार करत आहेत. त्यासाठी आज दादरच्या योगी सभागृहात कबूतर(pigeon)बचाओ या धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं होत. या धर्मसभेच्या निमित्ताने जैन, हिंदू,बौद्ध धर्मगुरु हे सगळे एकाच मंचावर एकत्र पाहायला मिळाले. या धर्म सभेत कैवल्यरत्न महाराज यांनी एक धक्कादायक असं वक्तव्य केलं आहे. ते म्हणतात “एखाद-दुसरा व्यक्ती मेल्याने काय होणार आहे?’ ‘मी डॉक्टरांना मूर्ख मानतो’ अस देखील वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वादंग उठण्याची शक्यता आहे. पुढे ते म्हणतात “कबुतरांना एक शस्त्र बनवलं आहे. कबूतराशी तर काही देणंघेणच नाही. कबूतराच्या विष्ठेतून जो रोग पसरत आहे त्याच्याशीसुद्धा देणंघेणं नाही. एखादा माणूस जरी मेला तरी त्याच्याशी काही देणं घेणं नाही” अशी वक्तव्य कैवल्य रत्न महाराज यांनी या सभेत केली आहेत.
झाडाचं पान अंगावर पडून माणूस मेला हे मान्य कराल का?
“हजारो, लाखो निष्पाप लोक आपले प्राण गमावतात, त्या बद्दल कोणी विचार करत नाही आहे. पाण्यासासाठी तडफडणार्यांबद्दल कोणाकडे विचार करायला वेळ नाही. एखादा माणूस झाडाचे पान अंगावर पडून मेला हे मान्य कराल का? हा सगळा मूर्खपणा आहे. कबुतराच्या विष्ठेमुळे जीव जाऊ शकतो का ? अस असेल तर मी डॉक्टरांना सुद्धा मूर्ख मानतो” असं वक्तव्य कैवल्य रत्न महाराजांनी केलं आहे.
सुरेशजी महाराज यांचं वक्तव्य:
कबूतर हा एक शांतताप्रिय प्राणी आहे. त्याची हत्या झाली म्हणजे भगवान शंकराची हत्या झाल्यासारखं आहे. कबूतर आणि गाय राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा, ही माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळकळीची विनंती आहे, असं सुरेशजी महाराज म्हणाले.
हे देखील वाचा –
Leopard Attack: बिबट्याच्या बछड्याच्या हल्ल्यात तिघेजण जखमी; बिबट्याच्या बछड्याने केला हल्ला..