Home / आरोग्य / White Hair Remedies: पांढऱ्याकेसांनी त्रस्त आहेत का? वापरून बघा हे घरगुती उपाय..

White Hair Remedies: पांढऱ्याकेसांनी त्रस्त आहेत का? वापरून बघा हे घरगुती उपाय..

White Hair Remedies: आज काल अकाली केस पांढरे(hair)होण्याच्या अनेक समस्या उत्भवत आहेत. जास्त स्ट्रेस, (Stress)बदलत राहणीमान, आजूबाजूची धूळ याचा आपल्या...

By: Team Navakal
White Hair Remedies

White Hair Remedies: आज काल अकाली केस पांढरे(hair)होण्याच्या अनेक समस्या उत्भवत आहेत. जास्त स्ट्रेस, (Stress)बदलत राहणीमान, आजूबाजूची धूळ याचा आपल्या केसांवर खोलवर परिणाम होतो. पंचविशीच्या आतच पांढरे केस आल्यामुळे या समस्येमुळे अनेक जण हैराण आहेत. अवेळी खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तणाव, अपुरी झोप यांसारख्या अन्य गोष्टी केस पांढरे होण्यास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. काही नैसर्गिक उपाय करून तुम्ही या समस्येतून सुटका मिळवू शकता. 

सगळ्यात आधी जास्वंदाचे फुल आणि दह्याचे पॅक (Hibiscus Yogurt Pack) एकत्र बनवून तुम्ही लावू शकता. अनके मीडिया रिपोर्टनुसार डॉकरांच्यामते जास्वंदाचे फुल आणि दह्याचे मिश्रण लावल्यास स्कॅल्पला पोषणतत्त्वांचा पुरवठा योग्य रित्या होतो आणि केसांचे मूळ देखील मजबूत राहतात. एका छोटया वाटीत चार चमचे दही आणि १/४ कप जास्वंदाच्या फुलाची पावडर घेऊन पेस्ट तयार करून घ्या. पेस्ट तयार झाल्यानंतर स्कॅल्पसह ती केसांवर लावा. शेवटी ३०-४० मिनिटांनंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. याद्वारे केसांना नैसर्गिक असा रंग मिळेल.

भृंगराज आणि आवळा (Bhringraj and Amla Oil) या दोन्ही गोष्टींमुळे केस काळे आणि घनदाट होण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही तेल सामान प्रमाणात एकत्रित घेऊन केसांना लावा. स्कॅल्पला आपल्या हलक्या हाताने मसाज करा. तुम्हाला हवे त्या दिवशी केस धुवा. या तेलांमुळे केसांची वाढ होते आणि पांढऱ्या केसांचीही समस्या देखील उद्भवत नाही. 

अश्वगंधा(Ashwagandha)एक शक्तिशाली औषध वनस्पती आहे, ज्यामुळे शरीरामध्ये मेलेनिनचा स्त्राव होण्यास देखील मदत मिळते. यामुळे केसांना नैसर्गिकरित्या काळा रंगही मिळतो. एक कप पाण्यात पूर्ण एक चमचा अश्वगंधा पावडर मिक्स करा, १०-१५ मिनिटे पावडर चांगली उकळू द्यावी. पाण्यामध्ये तुम्हाला  हव्या त्या प्रमाणात मध, लिंबू मिक्स करा. आणि गाळून पिऊन घ्या.

बऱ्याचदा खाण्यापिण्याच्या सवयीमुळे केसांवर सुद्धा त्याचा परिणाम होतो.  तुमच्या रोजच्या जेवणार काजू, बदाम, दही, पनीर, केळ, अक्रोड, अळशीच्या बिया, पालक, ब्रोकोली यासारख्या गोष्टीं समाविष्ट करा. यामुळे शरीराला कॉपर, व्हिटॅमिन-B आणि ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडचा पुरवठा सुद्धा होतो.


हे देखील वाचा –

Maharashtra weather update:अखेर पावसाच मळभ दूर होणार..मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु..

या माहितीची पुष्टी आम्ही करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या