Home / महाराष्ट्र / Buldhana Crime: गरोदर महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण; बाळाचा दुर्दैवी अंत..

Buldhana Crime: गरोदर महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण; बाळाचा दुर्दैवी अंत..

Buldhana Crime: आपण रोजच प्रचंड हिंसक चर्चा ऐकतो. महाराष्ट्रातील सततच्या वाढत्या हिंसक गोष्टींमुळे महारष्ट्रातील काही भागात गढूळ वातावरण निर्माण झालं...

By: Team Navakal
Buldhana Crime

Buldhana Crime: आपण रोजच प्रचंड हिंसक चर्चा ऐकतो. महाराष्ट्रातील सततच्या वाढत्या हिंसक गोष्टींमुळे महारष्ट्रातील काही भागात गढूळ वातावरण निर्माण झालं आहे. अशीच एक मन हेलवणारी घटना बुलडाणा(Buldhana)जिल्ह्यात घडली आहे. भाजीपाल्याचा किरकोळ वाद हा मोठ्या मारहाणीत प्रस्थपित झाला. भाजीपाल्यासारख्या किरकोळ वादातून गरोदर महिलेला लाथा बुक्क्यांनी(woman-beaten)बेदम मारहाण करण्यात अली आहे.त्याच बरोबर तिच्या कुटुंबाला देखील बेदम मारहाण करण्यात आल्याचा लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे.

बुलडाणा(Buldhana)जिल्ह्यातील शेगाव येथील सम्राट चौकात भाजीपाल्याच्या किरकोळ वादातून हि गंभीर घटना घडली आहे. विजय गावंडे, त्यांचा मुलगा गौरव गावंडे तसेच पत्नी आणि मुलगी यांनी फिर्यादी कुटुंबाला शिवीगाळ केली आहे. याशिवाय त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात फिर्यादीचे कपडे देखील फाडण्यात आले, तर दोन महिन्याच्या गरोदर महिलेला पोटावर लाथाबुक्क्यांनी जबरदस्त मारहाण करण्यात आली. या सगळ्याप्रकारत गरोदर महिलेला मात्र तीच बाळ गमवावं लागलं आहे. या संदर्भातील धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या घटनेची तक्रार शेगाव पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली. मात्र पोलिसांनी तक्रारदारांना जवजवळ तीन तास बसवून ठेवले, असा आरोप देखील फिर्यादीच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर गरोदर महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला अकोलयातील रुग्णलयात हलविण्यात आले. मात्र; यावर योग्य उपचार न मिळाल्याने गरोदर महिलेच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला.  या सगळ्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


हे देखील वाचा –

White Hair Remedies: पांढऱ्याकेसांनी त्रस्त आहेत का? वापरून बघा हे घरगुती उपाय..

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या