Home / महाराष्ट्र / Mumbai Metro Line 3 : मुंबई मेट्रो ३ ला प्रवाशांची तुंबळ गर्दी, मुंबई मेट्रो- ३ला प्रवाशांची पसंती.

Mumbai Metro Line 3 : मुंबई मेट्रो ३ ला प्रवाशांची तुंबळ गर्दी, मुंबई मेट्रो- ३ला प्रवाशांची पसंती.

Mumbai Metro Line 3 : मुंबई मेट्रो 3 ला (Mumbai Metro Line 3) अगदी पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्याही दिवशी प्रवाशांनी भरभरून...

By: Team Navakal
Mumbai Metro Line 3

Mumbai Metro Line 3 : मुंबई मेट्रो 3 ला (Mumbai Metro Line 3) अगदी पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्याही दिवशी प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री ९ वाजेपर्यंत या मेट्रोवरून (Mumbai Metro)  १ लाख ५९ हजार १०५ प्रवाशांनी प्रवास केला आहे. दुसऱ्या दिवशीही वाढती प्रवासी संख्या पाहता  लवकरच ही मेट्रो मार्गिका (Mumbai Metro) दोन लाख प्रवाशांचा टप्पा पार करेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  त्यातून पश्चिम उपनगरात जाणाऱ्या प्रवाशांना हा नवा पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे. तसेच दक्षिण मुंबईतील प्रचंड वाहतूक कोंडीतून आणि बस आणि शेअर टॅक्सीसारख्या वेळ काढू वाहनाऐवजी, प्रवासी या सेवेचा पर्यायी वापर करताना दिसत आहेत.

ही मेट्रो-सेवा सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी गुरुवारी दिवसभरात १ लाख ५६ हजार प्रवाशांनी प्रवास केला. या दिवशी कार्यालयातून घरी परतणाऱ्या  प्रवाशांनी विधानभवन मेट्रो स्थानकावर तुंबळ गर्दी केली होती. त्यातून स्थानकाचे प्रवेशद्वार एन्ट्री आणि एक्झिट गेट १० मिनिटांसाठी बंद करावा लागला होत.

आरे ते कफ परेड मोट्रो मार्गिकेवर शुक्रवारीही मोठी गर्दी दिसून आली. विधानभवन, सीएसएमटी या स्थानकांवर तुफान गर्दी होती. स्थानकात नेटवर्क उपलब्ध नसल्या कारणामुळे प्रवाशांना खिडकीवरूनच तिकीट काढण्याशिवाय पर्याय नव्हता. तसेच प्रवासी संख्या जास्तच असल्याने गर्दीच्या वेळी या मार्गावर मेट्रो  भरून धावत होती. त्यातून अनेकांना धक्के खातच प्रवास करावा लागत होता. दरम्यान, अनेकांनी मेट्रो संदर्भातील उत्सुकता होती म्हणून देखील प्रवास केला. मुंबई मेट्रो लाईन-३ मुळे दक्षिण मुंबईतील बेस्टला याचा मोठा फटका बसला. यामुळे महत्वाच्या मार्गावर प्रवासी संख्या २१% घाटली आहे.

Metro Line 3 Aqua Line : मेट्रो 3 तीन कोण  कोणत्या टप्प्यात आहे?

सगळ्यात पहिला टप्पा आरे ते बीकेसी (Aarey ते BKC) हा आधीच सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (BKC ते Acharya Atre Chowk) हि लाईन देखील सुरू आहे. तिसरा टप्पा म्हणजे आचार्य अत्रे ते कफ परेड (Acharya Atre Chowk ते Cuffe Parade) याचे नुकतेच उद्घाट पार पडले.


हे देखील वाचा – 

Buldhana Crime: गरोदर महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण; बाळाचा दुर्दैवी अंत..

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या