Shefali-Jariwala: अभिनेत्री शेफाली(Shefali-Jariwala) हिच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. २७ जून रोजी रात्री शेफालीने(Shefali-Jariwala) Xशेवटचा श्वास घेतला. तिच्या मृत्यूनंतर अनेक चर्चा देखील रंगल्या. तिच्या निधनाने तिच्या घरातल्यान प्रचंड मोठा धक्का बसला. २७ जूनला तिच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती त्यासाठी तिने दिवसभर उपवास पकडला होता आणि त्याच दिवशी रात्री फ्रीजमधील अन्न गरम करून खाल्ल्यानंतर तिला अचानक त्रास सुरु झाला. तिचा पती पराग त्यागी(Parag-Tyagi)याने रूग्णालयात दाखल केले आणि डॉक्टरांनी तिला काही काळातच मृत घोषित केले. शेफालीच्या निधनानंतर तिच्या नवऱ्याला बर्र्याचदा व्यकुळ होताना पाहिलं आहे. तिच्या आठवणीत तो बऱ्याचदा तिच्यासाठीच पोस्ट देखील टाकतो.
आता नुकताच पराग त्यागी याने सोशल मीडियावर शेफालीचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. करवा-चाैथच्या दिवशी शेफालीच्या आठवणीत तो भावुक झाला. यासोबतच त्याने एक अत्यंत भावनिक अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. तो म्हणतो “तुझ्याशिवाय मी श्वास घेऊ शकत नाही; हेच नाही तर मला तुझ्याकडे बोलाव”असही परागने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तो पुढे म्हणतो “मी नेहमीच तुझी वाट बघीन. जरी मला स्वर्गात यावे लागले तरीही चालेल. जर मी कधी तुला शोधू शकलो नाही तर मी तुला विनंती करेल की, तू मला शोध.. मी तुला आपली वचन आणि प्रतिज्ञा सगळ्याची आठवण करून देतो , तू माझी आहेस. माझ्यासाठी काहीच महत्वाचे नाही की, काय घडले. माझे प्रेम कायमच फक्त तू राहशील.
माझ्यासाठी अजिबात महत्वाचे नाही कोण काय म्हणत, तू माझ्यासाठी नेहमीच ती राहशील जिचे मी काैतुक करतो. मी फक्त तुझी वाट बघत राहीन. मी तुला तिथेच मिळेल, पण मला आता तुझी प्रतीक्षा कारण असह्य झालं आहे. कृपया जर शक्य असेल तर लवकरा लवकर मला तिथे बोलाव. मला तुझ्याशिवाय श्वास घेणं देखील कठीण झालं आहे. अशी भावनिक पोस्ट पराग याने शेयर केली आहे.
हे देखील वाचा –
Mumbai Metro Line 3 : मुंबई मेट्रो ३ ला प्रवाशांची तुंबळ गर्दी, मुंबई मेट्रो- ३ला प्रवाशांची पसंती.