Uddhav Thackeray: आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा हंबरडा मोर्चा पार पडला, या मोर्चानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देखील जाहीर केली गेली आहे, मात्र शासनानं पॅकेज अत्यंत कमी आणि फसवं असल्याची घणाघाती टीका आता विरोधकांकडून होत आहे.
यात उद्धव ठाकरेंनी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. शेतकऱ्यांना पैसा का दिला जात नाही, पैशांची कमी वाटत असेल तर पीएम केअर फंडातून पैसे आणा, जुन्या पैशांची बेरीज करून हा आकडा तयार करण्यात आला आहे, हे दिशाभूल करणार पॅकेज आहे. आम्ही त्यावेळी एनडीआरएफच्या निकषांवर पॅकेज दिलं होतं, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणतात राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिला. कर्जमाफी होईपर्यंत हे सरकार आम्ही सोडणार नाही. विरोधी पक्षनेता महाराष्ट्रात नेमला जात नाही कारण असा काही नियमच नाही आहे. तुमचे संख्याबळ नाही असं सांगितलं जात आहे. मग उपमुख्यमंत्री हे पद तर असंवैधानिक आहे, तुम्ही ते पद कस काय दोन-दोन नेत्यांना देताय ? आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री देखील मानायला तयार नाही. त्यांना पदावरून काढून टाका.
मागे बीकेसीत ब्रिटनचे पंतप्रधान आले होते. तेव्हा त्यांनी शहरभर होर्डिंग्ज लावली. त्या गोष्टीची प्रचंड हवा केली.मुंबई अगदी बरबटून टाकली.ब्रिटनच्या पंतप्रधानांनी शिंदे गटात प्रवेश केला की काय? असे पोस्टर्स लावण्यात आले होते.जाहिरातीवर करोडो खर्च करता परंतु शेतकऱ्यांना का देत नाही आहात हे पैसे. असा सवाल यावेळी उद्धव यांनी विचारला.
हे देखील वाचा –