Home / देश-विदेश / Australia-Plane-Crash: टेक ऑफ करताना खाजगी विमान कोसळल! तीन जणांचा जागीच मृत्यू..

Australia-Plane-Crash: टेक ऑफ करताना खाजगी विमान कोसळल! तीन जणांचा जागीच मृत्यू..

Australia-Plane-Crash: ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स येथे आज सकाळच्या सुमारास टेक ऑफ करताना एक खासगी विमान कोसळले. आणि त्या विमानाला आग...

By: Team Navakal
Australia-Plane-Crash
Social + WhatsApp CTA

Australia-Plane-Crash: ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स येथे आज सकाळच्या सुमारास टेक ऑफ करताना एक खासगी विमान कोसळले. आणि त्या विमानाला आग लागली. शेल हार्बर विमानतळावर ही दुर्घटना घडली आहे. विमानात असलेल्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सिडनीच्या दक्षिणेस अंदाजे ८५ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेल हार्बर विमानतळावर हि दुर्घटना घडली आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास या विमानाने उड्डाण केले आणि उड्डाण घेतल्यानंतर थोड्याच वेळात विमान जमिनीवर कोसळले. अपघातानंतर लगेचच विमानाला भीषण आग लागली. न्यू साउथ वेल्स अग्निशमन आणि बचाव दलाने ही आग विझवली देखील; मात्र, या विमानातील तिघांचाही मृत्यू झाला.

न्यू साउथ वेल्स अग्निशमन आणि बचाव दलाचे निरीक्षक अँड्र्यू बार्बर यांनी या बाबतची अधिकची माहिती दिली आहे. ते सांगतात अपघात झाला तेव्हा स्थानिक रुरल फायर सर्व्हिसचे (RFS) युनिट विमानतळावर प्रशिक्षण घेत होते. हा अपघात पाहणारा एक प्रत्यक्षदर्शी होता. त्याने ताडीने मदतीसाठी धाव घेतली. परंतु, इंधनाच्या ज्वलनामुळे परिस्थिती हात बाहेर गली होती. तेथील परिस्तिथि आधीच गंभीर असल्याने विमानातील लोकांना वाचवण्यात यश आले नाही. ते विमान जळून खाक झाले.


हे देखील वाचा –

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची सरकारवर सडकून टीका..

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या