Home / arthmitra / 4 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला PM किसान योजनेचा हप्ता; तुम्हाला कधी मिळणार 2 हजार रुपये? जाणून घ्या

4 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला PM किसान योजनेचा हप्ता; तुम्हाला कधी मिळणार 2 हजार रुपये? जाणून घ्या

PM Kisan Yojana 21st Installment: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojana) 21 व्या हप्त्याकडे देशभरातील कोट्यवधी शेतकरी डोळे...

By: Team Navakal
PM Kisan Yojana 21st Installment

PM Kisan Yojana 21st Installment: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojana) 21 व्या हप्त्याकडे देशभरातील कोट्यवधी शेतकरी डोळे लावून बसले आहेत. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला 2,000 रुपये कधी मिळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या 4 राज्यांत झालेल्या अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे नुकसानीचा विचार करून, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी 21 वा हप्ता वेळेपूर्वीच त्यांच्या बँक खात्यात जमा केला आहे. आता देशातील इतर शेतकरी योजनेचा पुढील हफ्ता कधी मिळणार? याबाबत प्रश्नच विचारत आहेत.

PM Kisan Yojana: 21 वा हप्ता कधी जमा होणार?

इतर राज्यांतील शेतकऱ्यांना हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. सरकारकडून कोणतीही ठोस घोषणा झालेली नसली तरी, रिपोर्टनुसार हा हप्ता दिवाळीपूर्वी म्हणजेच 20 ऑक्टोबर पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रबल शक्यता आहे.

मागील वर्षांतील वेळापत्रकानुसार हा हप्ता आतापर्यंत जारी होणे अपेक्षित होते, पण यंदा फक्त पूरग्रस्त राज्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.

तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत, जर…

ज्या शेतकऱ्यांनी आपले खाते व्यवस्थित केले नाही, त्यांना या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते. खालील त्रुटींमुळे 2,000 रुपये जमा होण्यास अडथळा येऊ शकतो:

  • ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया अपूर्ण असल्यास.
  • आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नसणे.
  • बँक खाते बंद असणे किंवा IFSC कोड चुकीचा असणे.
  • वैयक्तिक माहिती जुळत नसणे.

त्यामुळे, ई-केवायसी पूर्ण केलेल्या, अचूक कागदपत्रे जमा केलेल्या आणि आधार बँक खात्याशी लिंक केलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीचा हा तोहफा मिळण्याची अपेक्षा आहे.

यादीत नाव तपासण्याची सोपी पद्धत

तुमचे नाव पीएम किसान योजनेच्या यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  • पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
  • Farmer Corner विभागातील Beneficiary List वर क्लिक करा.
  • येथे तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
  • ‘अहवाल मिळवा’ (Get Report) वर क्लिक करा आणि यादीमध्ये आपले नाव तपासा.
  • याच पद्धतीने तुम्ही ‘लाभार्थी स्टेटस’ (Beneficiary Status) तपासू शकता की, तुमच्या नावावर हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे की नाही.

हे देखील वाचा – ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’चा ट्रेलर लाँच; चित्रपटाविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले…

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या