Home / लेख / डॉक्टरांचे हस्ताक्षर इतके खराब का असते? ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

डॉक्टरांचे हस्ताक्षर इतके खराब का असते? ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

Doctors Bad Handwriting Reasons: तुम्हालाही कधी ना कधी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन वाचताना समस्या आली असेलच. औषधांचे नाव, डोस आणि इतर सूचना...

By: Team Navakal
Doctors Bad Handwriting Reasons

Doctors Bad Handwriting Reasons: तुम्हालाही कधी ना कधी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन वाचताना समस्या आली असेलच. औषधांचे नाव, डोस आणि इतर सूचना वाचता न आल्यामुळे अनेकदा आपण गोंधळून जातो, तर केमिस्ट देखील केवळ अंदाजे औषध देतात. ही केवळ एक साधी समस्या राहिलेली नाही, तर यातून रुग्णांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

डॉक्टरांच्या खराब हस्ताक्षराची समस्या सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, या समस्याचे नक्की कारण काय? याबाबत जाणून घेऊया.

खराब हस्ताक्षराचे गंभीर परिणाम

डॉक्टरांच्या खराब हस्ताक्षरामुळे अनेकदा चुकीची औषधे, चुकीचा डोस आणि कायदेशीर प्रकरणांमध्ये विलंब होतो, ज्यामुळे रुग्णांचा जीवही धोक्यात येऊ शकतो.

डॉक्टरांचे हस्ताक्षर बिघडण्याची 3 प्रमुख कारणे

वेळेचे दडपण : वैद्यकीय विद्यार्थी अभ्यासक्रमादरम्यान वेळेच्या दडपणामुळे खूप लिहितात, ज्यामुळे त्यांचे हस्ताक्षर खराब होते.

रुग्णांचा प्रचंड भार: एकदा प्रॅक्टिस सुरू झाल्यावर, विशेषतः सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना एका शिफ्टमध्ये अनेक रुग्णांना तपासावे लागते. या प्रचंड भारामुळे प्रिस्क्रिप्शन त्वरीत लिहिण्याच्या घाईत अक्षर खराब होते.

परिचित औषधांवर अवलंबून राहणे: अनेकदा डॉक्टर्स विशिष्ट भागातील केमिस्टना वारंवार लिहून दिल्या जाणाऱ्या औषधांची नावे माहित असतात, यावर अवलंबून राहून डॉक्टर औषधाचे नाव घाईत गिरवतात. त्यामुळे, प्रिस्क्रिप्शनचा ‘निरीक्षण’ भाग वाचनीय असतो, पण औषधांचा भाग अस्पष्ट असतो.

अन्य कारणे

काही डॉक्टरांच्या मते, वैद्यकीय अभ्यासक्रमात लांबलचक उत्तरे लिहिणे, तसेच काही डॉक्टरांचे सुरुवातीच्या शिक्षणात इंग्रजी ही पहिली भाषा नसणे, यामुळेही हस्ताक्षराच्या स्पष्टतेवर परिणाम होतो.

केमिस्ट प्रिस्क्रिप्शन कसे वाचतात?

केमिस्ट सांगतात की, त्यांच्याकडे खराब अक्षर वाचण्यासाठी कोणतेही औपचारिक नियम (SOP) नसतात. मात्र, ते जवळच्या डॉक्टरांना आणि त्यांच्या सामान्य प्रिस्क्रिप्शनमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांना ओळखून घेतात.

अनेकदा फार्मा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शिफारस केलेले ब्रँड्स स्थानिक फार्मसीमध्ये उपलब्ध असल्याने केमिस्ट अंदाज लावू शकतात. तरीही, शंका असल्यास ते डॉक्टरांशी थेट फोन करून खात्री करतात.

या समस्येवर उपाय म्हणून आता डॉक्टर थेट कॉम्प्युटर प्रिंटेड प्रिस्क्रिप्शन देतात. ज्यामुळे औषधांचे नाव ओळखण्यात अडचण येत नाही.

हे देखील वाचा – P Chidambaram: ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ चुकीच्या पद्धतीने केल्याने इंदिरा गांधींना…’; पी. चिदंबरम यांचे मोठे विधान

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या