Ladakh Violence ! Opposition Planned Delegation – लेह, लडाखमध्ये २४ सप्टेंबर पासून परिस्थिती अस्थिर आहे. याठिकाणी झालेल्या हिंसाचारानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस, सीपीआय(एम), आम आदमी पार्टी (आप), समाजवादी पार्टी (सपा) आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) यासारख्या प्रमुख विरोधी पक्षांनी लडाखला शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या शिष्टमंडळाच्या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात लडाखला राज्याचा दर्जा आणि आदिवासी हक्क मिळावे या मागणीसाठी लेहमध्ये निदर्शने झाली. या निदर्शनांदरम्यान झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसएस) अंतर्गत निदर्शकांना चिथावणी दिल्याचा आरोप करत २६ सप्टेंबर रोजी अटक केली. सुरक्षायंत्रणेच्या या कारवाईमुळे विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली.
लेह एपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सने या हिंसाचाराच्या घटनांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. देशातील विरोधी पक्षांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान,हिंसाचारानंतर बंद केलेली इंटरनेट सेवा ९ ऑक्टोबरच्या रात्री लेहमध्ये पुन्हा सुरू झाली. मात्र या निर्णयासंदर्भात कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी झालेली नाही. स्थानिक प्रशासनाने समाज माध्यमावर अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
हे देखील वाचा –
महाराष्ट्रातील 50 लाख कोटी रुपयांची संपत्ती होणार अनलॉक!
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’चा ट्रेलर लाँच; चित्रपटाविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले…