World Record – कायम शाकाहारी पदार्थ बनवणारे म्हणून प्रसिद्ध असलेले सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर (Celebrity chef Vishnu Manohar)यांनी यावेळी एक अनोखा प्रयोग करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्यांनी ५००१ अंड्यांची भुर्जी (5,001 Scrambled eggs)बनवून जागतिक विक्रम केला आहे.
हा उपक्रम महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाच्या (Veterinary College)कुक्कुटपालन शास्त्र विभागाने आयोजित केला होता. हा कार्यक्रम १० ऑक्टोबरला होणाऱ्या जागतिक अंडी दिवसाच्या निमित्ताने (World Egg Day)घेण्यात येणार होता. तो आज आयोजित करण्यात आला. उद्देश अंड्यांविषयी जनजागृती करणे हा होता.
अनेक जागतिक विक्रम नोंदवलेलेल्या विष्णू मनोहर यांनी काही दिवसांपूर्वी अमरावती येथे सुमारे ५ हजार किलो भरडधान्याची (Millet khichdi) खिचडी बनवली होती त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच अंड्याचा पदार्थ तयार करून नवा विक्रम रचला. मात्र, कायम शाकाहारी पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या विष्णू मनोहर यांनी यावेळी अंड्याचा पदार्थ बनवल्याने चर्चा रंगली आहे.
हे देखील वाचा –
मुंबईत परप्रांतीयांची संख्या वाढली ; छट पूजेसाठी मुंबईत विशेष सुविधा
ऑपरेशन ब्लू स्टार’ चुकीच्या पद्धतीने केल्याने इंदिरा गांधींना…’; पी. चिदंबरम यांचे मोठे विधान