Home / News / Pawan Kalyan Slams Govt Over Lulu Deal : लुलू गृपवर सरकार मेहरबान का ?पवन कल्याण यांचा संतप्त सवाल

Pawan Kalyan Slams Govt Over Lulu Deal : लुलू गृपवर सरकार मेहरबान का ?पवन कल्याण यांचा संतप्त सवाल

Pawan Kalyan Slams Govt Over Lulu Deal – लुलू गृपला अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी भूखंड देण्याच्या मुद्यावरून हैदराबादच्या मंत्रिमंडळ...

By: Team Navakal
Pawan Kalyan Slams Govt Over Lulu Deal


Pawan Kalyan Slams Govt Over Lulu Deal – लुलू गृपला अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी भूखंड देण्याच्या मुद्यावरून हैदराबादच्या मंत्रिमंडळ बैठकीत वातावरण चांगलेच तापले.

उपमुख्यमंत्री आणि जन सेना पार्टीचे प्रमुख पवन कल्याण यांनी बैठकीत हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरत सरकार आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना धारेवर धरले.


मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने लुलू गृपची उपकंपनी फेअर एक्स्पोर्टला कृष्णा जिल्ह्यातील मल्लावल्ली येथे अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी ७.४८ एकर जमीन नाममात्र भाडेतत्वावर दिली आहे. नियमांना बगल देऊन सरकारने विशेष बाब म्हणून हा भूखंड फेअर एक्स्पोर्टला दिला,अशी चर्चा आहे.


तोच धागा पकडत पवन कल्याण यांनी सरकार आणि संबंधित उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना जाब विचारला. अन्न प्रक्रिया म्हणजे नेमके काय हे स्पष्टपणे सांगा. दिशाभूल करणारी उत्तरे देऊ नका,या भूखंडावर फळबागा किंवा भाजीपाल्याची लागवड केली जाणार आहे की तिथे गाई-म्हशी कापून मांसाची निर्यात करण्याची योजना आहे असा खडा सवाल पवन कल्याण यांनी अधिकाऱ्यांना केला.

त्यामुळे मंत्रीमंडळ बैठकीत वातावरण चांगलेच तापले. अखेर ताण हलका करण्यासाठी मुख्यमंत्री नायडू यांनी तातडीने निवेदन केले. या भूखंडावर केवळ फळांवर प्रक्रिया केली जाणार आहे, कोणत्याही प्रकारच्या मांसाहारी पदार्थावर प्रक्रिया केली जाणार नाही,असे नायडू यांनी सांगितले.


तेवढ्याने पवन कल्याण यांचे समाधान झाले नाही.लुलू गृप आणि त्यांच्या समुहातील कंपन्यांबाबत सरकार एवढे उदार का आहे, या उद्योगात स्थानिकांना नोकऱ्या दिल्या जाणार की कंपनी आपले कर्मचारी बाहेरून घेऊन येणार,अशा प्रश्नांचा भडिमार पवन कल्याण यांनी महसूल मंत्री अनागनी सत्य प्रसाद यांच्यावर केला.


हे देखील वाचा –

लडाख हिंसाचार ! विरोधी पक्षांची शिष्टमंडळ पाठवण्याची तयारी

महाराष्ट्रातील 50 लाख कोटी रुपयांची संपत्ती होणार अनलॉक!

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’चा ट्रेलर लाँच; चित्रपटाविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले…

Web Title:
संबंधित बातम्या