Drone Post in Gadchiroli – सायकलच्या फिरत्या चाकांवरुन येणारा पोस्टमन हे सर्वसाधारण ग्रामीण भागात दिसणारे चित्र लवकरच गडचिरोली जिल्ह्यात बदलले जाणार आहे. त्या ऐवडी ड्रोनच्या पंख्याच्या घरघरीने येथील दुर्गम भागात टपाल पोहोचवले जाणार आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड, वैरागड व सिरोंचा या तीन तालुक्यातील २७ दुर्गम गावांमध्ये ही सेवा सुरु होणार आहे. हा भाग नक्षलग्रस्त व अतीशय दुर्गम असून पावसाळ्यात अनेक वेळा तिथे नद्यांना पूर, रस्तेच वाहून जाणे अशा अडचणी येत असतात.
या भागातील पोस्ट ऑफिसची शाखा जवळजवळ ८० किलोमीटर दूर आहेत. त्यामुळे इथे अत्यावश्यक पत्रे व औषधे किंवा इतर आवश्यक सामुग्री पोहोचवणे आवश्यक असून यासाठी ही सेवा सुरु करण्यात येत असल्याची माहिती चंद्रपूर विभागाचे वरिष्ठ पोस्ट संचालक एस. रामा कृष्णा यांनी दिली आहे.
ज्या दिवशी पोस्ट ऑफिसमध्ये एखादे पार्सल येईल ते त्याच दिवशी पोहोचवले पाहिजे या तत्वावर काम केल जाणार असल्याचेही ते म्हणाले. काही महिन्यांपूर्वी नेरळ ते माथेरान दरम्यान पोस्ट खात्याने ड्रोनद्वारे औषधे पोहोचवून या उपक्रमाची चाचणी घेतली होती.
ती यशस्वी झाल्यानंतर आता ती गडचिरोलीच्या दुर्गम भागात तो राबवला जाणार आहे. या सेवेमुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय सरकारी कागदपत्रे, वृत्तपत्रे व औषधे पोहोचवली जाणार आहेत.
हे देखील वाचा –
तेलंगणा स्थानिक स्वराज्य संस्था ओबीसींचे ४२ टक्के आरक्षण स्थगित !