Mahim Fort Revitalisation – माहिम येथील ऐतिहासिक किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करण्याच्या कामासाठी पालिका प्रशासन सरसावले आहे.यासाठी सीमा शुल्क विभागाने सीमांकन प्रक्रिया पूर्ण केली आहे.
त्यामुळे आता या माहीम किल्ल्याच्या पुनरुज्जीवन आराखडा तयार करण्याचा मुंबई पालिकेचा मार्ग सुकर झाला आहे.
माहिमचा किल्ला ही मुंबईतील अतिशय पुराण वास्तू असून तेराव्या शतकामध्ये राजा बिंबाराजाने बांधलेला हा मूळचा किल्ला आहे. चौदाव्या शतकामध्ये गुजरातच्या सुलतानाने त्यावर हल्ला केला आणि सोळाव्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी या ठिकाणी हा किल्ला उभा केला, तो आज माहिमचा किल्ला म्हणून ओळखला जातो.
एक हजारहून अधिक वर्षांच्या या किल्ल्याला ग्रेड १ वारसस्थळाचे नामांकन मिळाले आहे. ‘मात्र, किल्ल्यावरील अतिक्रमणामुळे आणि दुर्लक्षामुळे किल्ला जीर्णावस्थेत पोहोचला होता.त्यामुळे प्रशासनाने किल्ल्याचे जतन करण्यासाठी आणि पर्यटन वाढवण्यासाठी किल्ल्याचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार किल्ल्याला नवी झळाळी देण्यासह किल्ल्याची पुरातन वास्तू कशी होती,बुरुज, कोट, भिंती,त्यावेळी किल्ल्यात असलेल्या वास्तू या जुन्या काळाप्रमाणेच दिसाव्यात याचा विचार करून सौंदर्यीकरण केले जाणार आहे.यासाठी पालिका आणि सीमा शुल्क विभाग यांच्यामध्ये करार होणार असून वीरमाता जिजाबाई तांत्रिक संस्था म्हणजे व्हीजेटीआय येथील तज्ज्ञांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा –
गडचिरोली जिल्ह्यात ड्रोनद्वारे टपाल सेवा
तेलंगणा स्थानिक स्वराज्य संस्था ओबीसींचे ४२ टक्के आरक्षण स्थगित !