Doctor Assault – पश्चिम बंगालमध्ये (West Bengal)विद्यार्थिनींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथील येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे (MBBS)शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर अज्ञात इसमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर इतर दोघांचा शोध सुरू आहे.
गेल्या वर्षी कोलकात्याच्या आरजीकर रुग्णालयात (RG Kar Medical College) महिला डॉक्टरवरील बलात्काराच्या घटनेमुळे राज्यभरातील वातावरण ढवळून गेले होते. ताजी घटना बंगालच्या पश्चिम बर्धमान जिल्ह्यात घडली आहे. पीडित विद्यार्थिनी आपल्या मित्रासोबत रात्रीच्या जेवणासाठी महाविद्यालयाच्या आवारातून बाहेर गेली होती. ती परतली असतातीन अज्ञात इसमांनी तिला बळजबरी फरफटत महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिचा मोबाईल काढून घेतला होता. तिच्या मित्राने तिची सुटका करून तिला पुन्हा महाविद्यालयात आणले. या घटनेची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करून महाविद्यालयाच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्याची मागणी केली.
हे देखील वाचा –
नीलेश घायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी
तेलंगणा स्थानिक स्वराज्य संस्था ओबीसींचे ४२ टक्के आरक्षण स्थगित