Trump & Dada Bhuse Ties ! – आगामी कुंभमेळ्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पदावरून महायुतीत शिंदे गट आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नाशिकचा वाद सोडवतील, असे मिश्किल वक्तव्य मंत्री दादा भुसे यांनी केले होते. या वक्तव्यानंतर ट्रम्प आणि त्यांचे घनिष्ट संबंध असतील, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी भुसेंना टोला लगावला.
गेल्या आठवड्यात गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बंद दाराआड चर्चा केली होती. या बैठकीत नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत तोडगा निघाला का?
असा प्रश्न भुसे यांना विचारण्यात आला होता. यावर भुसे यांनी पालकमंत्रीपदाचा वाद आता थेट ट्रम्प यांच्याकडेच न्यावा लागेल, असे उपरोधिक विधान केले होते.
पालकमंत्रीपदाचे दावेदार असलेले मंत्री महाजन म्हणाले की, दादा भुसे यांच्या म्हणण्यानुसार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे घनिष्ठ संबंध कदाचित असतील. त्यामुळे ते ट्रम्प यांना नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सोडविण्याची विनंती करतील.
किंवा फोन करून सांगतील की काही तरी करा म्हणून. माझे तसे कोणतेच संबंध अमेरिकेशी नाहीत किंवा मी तिकडे गेलोही नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीदेखील माझी नाशिकच्या पालकमंत्रीपदाविषयी चर्चा झालेली नाही.
हे देखील वाचा –
गडचिरोली जिल्ह्यात ड्रोनद्वारे टपाल सेवा
तेलंगणा स्थानिक स्वराज्य संस्था ओबीसींचे ४२ टक्के आरक्षण स्थगित !