Maruti Alto K10 EMI Offer: देशातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आपल्या विविध सेगमेंटमधील वाहनांसाठी ओळखली जाते. मारुतीची Alto K10 ही देशातील सर्वात स्वस्त कार म्हणून बाजारात उपलब्ध आहे.
जर तुम्ही कमी बजेटमध्ये ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 1,00,000 रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर पुढील सात वर्षांसाठी तुम्हाला मासिक EMI भरावा लागेल. तुम्ही दरमहिन्याला फक्त 4916 रुपये भरून ही गाडी घरी घेऊन जाऊ शकता.
Maruti Alto K10 ची ऑन रोड किंमत
मारुती ऑल्टो K10 च्या बेस व्हेरियंट LXI ची एक्स-शोरूम किंमत साधारणपणे 3,70,000 रुपये आहे. तसेच, इतर सर्व शुल्कांसह या कारची ऑन-रोड किंमत अंदाजे 4,06,000 रुपये इतकी होते.
1,00,000 रुपये डाउन पेमेंटनंतरचा EMI
जर तुम्ही या कारच्या बेस व्हेरियंटसाठी 1,00,000 रुपये डाउन पेमेंट केली, तर उर्वरित रक्कम बँकेकडून फायनान्स केली जाते.
- फायनान्स होणारी रक्कम: 3,05,000 रुपये (अंदाजे).
- कर्जाचा कालावधी: 7 वर्षे (84 महिने).
- व्याजदर: बँक तुम्हाला 9% व्याजदराने कर्ज देत असल्यास.
- यानुसार, तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा केवळ 4,916 रुपये इतका EMI भरावा लागेल.
एकूण किती रुपयांना पडेल कार?
- 9% (9 Percent) व्याजदराने 7 वर्षांसाठी 3,05,000 रुपयांचे कार कर्ज घेतल्यास, तुम्हाला मासिक 4,916 रुपये EMI भरावा लागेल.
- व्याज म्हणून दिलेली एकूण रक्कम: सुमारे 1,07,000 रुपये.
- याचा अर्थ, एक्स-शोरूम, ऑन-रोड खर्च आणि व्याजाची एकूण किंमत मिळून ही कार तुम्हाला सुमारे 5,12,000 रुपयांना पडेल. कमी बजेटमध्ये नवी कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही EMI योजना अतिशय फायदेशीर ठरू शकते.
बाजारात कोणाशी आहे स्पर्धा?
Maruti Suzuki Alto K10 ही हॅचबॅक सेगमेंटमध्ये येते. बाजारात याचा थेट मुकाबला मारुतीच्याच Wagon R, S-Presso, Celerio आणि Renault Kwid, Tata Tiago यांसारख्या बजेट कार्ससोबत होतो.
हे देखील वाचा – ‘जे हुंडा घेतात ते नामर्द…’; अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे परखड विधान, म्हणाले…