Home / महाराष्ट्र / October Heat: राज्यात ऑक्टोबर महिन्यात उन्हाळ्याची झळ! उकाड्याने नागरिकांचे हाल..

October Heat: राज्यात ऑक्टोबर महिन्यात उन्हाळ्याची झळ! उकाड्याने नागरिकांचे हाल..

October Heat: राज्यातील हवामानात (Weather)सततचा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. आता अशातच राज्यात परतीच्या पावसाने उसंत घेतल्यामुळे नागरिकांना उन्हाच्या...

By: Team Navakal
October Heat

October Heat: राज्यातील हवामानात (Weather)सततचा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. आता अशातच राज्यात परतीच्या पावसाने उसंत घेतल्यामुळे नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यात ऑक्टोबरमध्ये उन्हळ्याचा (October Heat)अनुभव घावा लागत आहे. पावसाला पोषक वातावरण असून नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कमी झाला असून, या भागात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. काल सकाळपर्यंत राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उकाडा हा कायमच होता. बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३२ अंश इतका होता. तर, दुपारच्या वेळी उन्हाचा प्रकाश देखील काही ठिकाणी तीव्र होता.

रविवारी पहाटे पर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर जिल्ह्यात उच्चांकी ३४.५ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली. सोलापूरबरोबरच मुंबईतील सांताक्रुझ येथे ३४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आजही राज्यात उन्हाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मॉन्सूनन शुक्रवारी १० ऑकटोबर पासून संपूर्ण गुजरातसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागातून नाहीसा झाला आहे.

यावर्षी मे महिन्यात उडाका फारसा जाणवला नाही, कारण उकाडा जिथे परमोच्च शिखरावर असतो त्याच मे महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने देशात हजेरी लावली होती. महाराष्ट्रातही तीच प्ररीस्थिती पाहायला मिळाली. मात्र आता मे महिन्याची ही कसर ऑक्टोबरमध्ये पूर्ण होते कि काय असा प्रश्न सूर्याची दाहकता पाहता उपस्थित होत आहे. पुढील काही दिवस उष्णतेची दाहकता अशीच राहणार असून, यादरम्यान होणाऱ्या हवामान बदलांमुळं नागरिकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहनही यंत्रणांनी केल आहे.


हे देखील वाचा – 

देशातील सर्वात स्वस्त कार! फक्त दरमहिना 4,916 रुपये भरा आणि घरी घेऊन जा गाडी

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या