Home / आरोग्य / Benefits of ice cubes:रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर बर्फ लावावा का? डार्क सर्कल सुद्धा होतील नाहीसे..

Benefits of ice cubes:रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर बर्फ लावावा का? डार्क सर्कल सुद्धा होतील नाहीसे..

Benefits of ice cubes : बऱ्याच सेलेब्रिटीनां चेहऱ्यावर बर्फ लावतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतीलच. अनेक डॉक्टरांच्या मते बर्फ हा...

By: Team Navakal
Benefits of ice cubes

Benefits of ice cubes : बऱ्याच सेलेब्रिटीनां चेहऱ्यावर बर्फ लावतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतीलच. अनेक डॉक्टरांच्या मते बर्फ हा चेहऱ्यसाठी गुणकारी मानला जातो.  बर्फाच्या वापराने त्वचेच्या अनेक समस्या देखील दूर करण्यास मदत होते. दिवसातून एकदा हा बर्फाचा छोटा तुकडा जरी चेहऱ्यावरून फिरवला तरी रक्ताभिसरण वाढते, चेहऱ्यावरील छिद्रे आकुंचन पावतात, जळजळ आणि लालसरपणा देखील कमी होतो. आणि चेहरा मऊ बनतो.

तजेलदार त्वचेसाठी बर्फ उपयुक्त

धूळ, माती आणि अति प्रदूषणामुळे आपल्या त्वचेवरील नैसर्गिक चमक हि नाहीशी होते. चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो राहावा यासाठी आपण कित्येक प्रकारच्या क्रीम शिवाय लोशनचा वापर करतो. पण यामुळे आपल्या त्वचेला त्याचा काही क्षणांपुरताच फायदा होतो. दीर्घ कालीन उपाय हवे असल्यास घरगुती उपचारांची मदत घ्यावी. घरगुती उपाय म्हणून बर्फाचे काही तुकड्यानी देखील तुमच्या चेहऱ्याचा मसाज करू शकता. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक टिकून रहाते.

उन्हाळ्यामुळे त्वचेची जळजळ

उन्हाळ्यात सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेची जळजळ प्रचंड प्रमाणात होते. यामुळे आपली त्वचा हळूहळू काळी पडू लागते. सोबतच त्वचेवरील तेज देखील कमी होऊ लागतं. उन्हाळ्यात होणाऱ्या त्वचा संसर्गापासून सुटका हवी असेल तर बर्फाचा वापर करावा. त्वचेवर बर्फ लावल्यास त्वचेच्या जळजळीचा  त्रास कमी होईल. जळजळ होणे, बर्फाचा नियमितपणे वापर केल्यास त्वचेची जळजळ काही दिवसांत कमी होण्यास मदत मिळेल.

बराच काळ कम्प्युटरसमोर बसून काम करत राहिल्यानं, शिवाय अपुरी झोप या कारणांमुळे डार्क सर्कल तसंच डोळे सुजण्याची समस्या उद्भवते. यामुळे  चेहऱ्याच्या सौंदर्यात काही प्रमाणावर बाधा निर्माण होते. कित्येकदा आपल्याला आपल्या त्वचेच्या देखभालीसाठी वेळ मिळत नाही. परिणामी डोळ्याच्या आसपास त्वचेवर घाण जमा होऊ लागते. ज्यामुळे डोळ्यांचे सौंदर्य देखील बिघडते. यासाठी बर्फाचा वापर करणे हा एक उत्तम उपाय ठरू शकतो. बर्फामुळे डोळ्यांची सूज उतरते.

दिवसातून किती वेळा आयसिंग करावी?

निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी दिवसातून फक्त एकदाच बर्फाचा वापर करावा. बर्फाच्या जास्त वापरामुळे देखील त्वचा कोरडी होऊ शकते. यासाठी काय करावे? आयसिंग तुम्ही मेकअप आधी करावी. अथवा  झोपण्यापूर्वी आयसिंग करणे अत्यंत फायदेशीर असते. यामुळे तुमच्या त्वचेला काही तास आराम देखील मिळतो.


हे देखील वाचा –

Kurla Warehouse Fire: कुर्ल्यात मध्यरात्री भीषण आग, तब्बल ५ तासांनी आगीवर नियंत्रण

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या