Home / लेख / Zoho Mail vs Gmail: कोणत्या कंपनीची ईमेल सेवा आहे चांगली? जाणून घ्या वैशिष्ट्ये

Zoho Mail vs Gmail: कोणत्या कंपनीची ईमेल सेवा आहे चांगली? जाणून घ्या वैशिष्ट्ये

Zoho Mail vs Gmail: तमिळनाडू येथील झोहो कॉर्पोरेशन ने विकसित केलेली ई-मेल सेवा ‘झोहो मेल’ (Zoho Mail) सध्या चांगलीच चर्चेत...

By: Team Navakal
Zoho Mail vs Gmail

Zoho Mail vs Gmail: तमिळनाडू येथील झोहो कॉर्पोरेशन ने विकसित केलेली ई-मेल सेवा ‘झोहो मेल’ (Zoho Mail) सध्या चांगलीच चर्चेत आहे. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे या स्थानिक तंत्रज्ञान कंपनीने विकसित केलेल्या उत्पादनांकडे अनेक सरकारी अधिकारी आणि नवीन यूजर्सचे लक्ष वेधले आहे.

आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही अलीकडेच झोहोच्या वर्कप्लेस साधनांचा वापर करून तयार केलेले सादरीकरण केले होते, ज्यामुळे या ई-मेल सेवेबद्दल अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. इतर नेते देखील झोहोच्या सेवांचा वापर करत आहेत. यानिमित्ताने झोहो मेल आणि जीमेल पैकी कोणती सेवा चांगली आहे हे जाणून घेऊया.

Zoho Mail vs Gmail: मुख्य फरक काय?

सध्या चर्चेत असलेल्या झोहो मेलचे जीमेल (Gmail) आणि मायक्रोसॉफ्ट आउटलुक (Microsoft Outlook) यांसारख्या लोकप्रिय पर्यायांशी तुलना केल्यास काही मोठे फायदे समोर येतात:

  • फाइल अटॅचमेंट मर्यादा: झोहो मेल प्रति अटॅचमेंट 1GBपर्यंतची फाइल जोडण्याची कमाल मर्यादा देते, तर गुगल वर्कस्पेसची डीफॉल्ट मर्यादा 25MB प्रति फाइल आहे. मोठी फाइल असल्यास ती आपोआप लिंकमध्ये रूपांतरित केली जाते.
  • Recalling E-mail: झोहो मेलचे यूजर्स ई-मेल पाठवण्याची विंडो संपल्यानंतरही तो परत घेऊ शकतात. याउलट, जीमेलमध्ये ‘Undo Send’ करण्यासाठी फक्त काही सेकंदांचा कालावधी मिळतो.
  • उत्पादकता साधने: झोहो मेलमध्ये कॅलेंडर, टास्क, नोट्स आणि कॉन्टॅक्ट्स यांसारखी साधनेसमाविष्ट आहेत. यात ‘झोहो स्ट्रीम्स’ नावाचे एक स्नॅक (Slack) सारखे प्लॅटफॉर्मही आहे, जे कर्मचाऱ्यांमध्ये चांगले कामाचे समन्वय साधण्यास मदत करते.

AI क्षमता आणि सुरक्षा

  • AI असिस्टंट: झोहो मेलमध्ये झिया नावाचा AI असिस्टंट समाविष्ट आहे. तुम्ही फक्त एक वाक्य देऊन ई-मेल पटकन तयार करू शकता. झिया आपोआप विषयाची ओळआणि ई-मेल मजकूर सुचवतो, तसेच तो प्राप्तकर्त्यानुसार (Recipient) ई-मेलचा टोन देखील बदलू शकतो.
  • Gmail चे AI: जीमेल मध्ये गेल्या वर्षीपासून ई-मेलची सारांशआणि या वर्षी ‘संदर्भानुसार’ स्मार्ट रिप्लाय देण्यासाठी गुगल ड्राईव्हमधून माहिती देण्याची क्षमता जोडली आहे.

सुरक्षितता

कंपनीच्या माहितीनुसार, झोहो मेल धोकादायक अटॅचमेंट्स, फिशिंग प्रयत्न आणि खाते हॅक होण्यापासून संरक्षण देण्यासाठी अ‍ॅडव्हान्स्ड थ्रेट प्रोटेक्शन वापरते. सर्व ई-मेल ट्रान्झिटमध्ये आणि कंपनीच्या सर्व्हरवर साठवलेले असताना एन्क्रिप्ट केलेले असतात.

किंमत तुलना

  • मोफत प्लॅन्स : ‘फॉरएव्हर फ्री’ योजनेत 5यूजर्ससाठी 5GB स्टोरेजसह ई-मेल होस्टिंग मोफत मिळते.
  • सबस्क्रिप्शन खर्च: झोहो मेलचा सबस्क्रिप्शन प्लॅन प्रति यूजर दरमहा 59 रुपयांपासून (वार्षिक बिलिंगवर) सुरू होतो .
  • जीमेलचा खर्च: जीमेलचा (जेमिनी AI असिस्टंटसह) प्लॅन मोफत आहे. मात्र, इतर सुविधांचा फायदा घेण्यासाठी प्लॅनची किंमत प्रति महिना 160 रुपयांपासून सुरू होते.

हे देखील वाचा – SSC HSC Time Table: दहावी, बारावीची परीक्षा कधी होणार? बोर्डाकडून तारखा जाहीर

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या