Home / लेख / वेटर ते Cisco चे मुख्य उत्पादन अधिकारी; एकेकाळी 4 डॉलर कमवणाऱ्या ‘या’ भारतीय वंशाच्या व्यक्तीने कसे मिळवले यश? वाचा

वेटर ते Cisco चे मुख्य उत्पादन अधिकारी; एकेकाळी 4 डॉलर कमवणाऱ्या ‘या’ भारतीय वंशाच्या व्यक्तीने कसे मिळवले यश? वाचा

Jeetu Patel Cisco CPO: आज जगभरातील अनेक महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये भारतीय वंशाचे नागरिक सर्वोच्च पदापर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळते. अगदी गुगलपासून ते...

By: Team Navakal
Jeetu Patel Cisco CPO

Jeetu Patel Cisco CPO: आज जगभरातील अनेक महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये भारतीय वंशाचे नागरिक सर्वोच्च पदापर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळते. अगदी गुगलपासून ते अॅपलपर्यंत अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे नेतृत्व भारतीय वंशाची व्यक्ती करत आहे. या यादीतील एक नाव म्हणजे सिस्को (Cisco) कंपनीचे मुख्य उत्पादन अधिकारी जीतू पटेल.

आपल्या करिअरची सुरुवात अगदी वेटरपासून करणारे जीतू पटेल हे आज सिस्कोमध्ये मुख्य उत्पादन अधिकारी आहे.

प्रति तास $4 कमवण्यापासून ते $270 अब्ज बाजार मूल्य असलेल्या कंपनीत काम करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. मात्र, वेटर म्हणून मिळालेला अनुभव त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला आहे, असे ते सांगतात.

‘सर्व्हिस इंडस्ट्री’ मध्ये काम करण्याचा सल्ला

जीतू पटेल यांच्या मते, कठोर परिश्रमाचे अधिक चांगले मोल कळावे यासाठी प्रत्येकाने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात सर्व्हिस इंडस्ट्री मध्ये काम केले पाहिजे.

एका मुलाखतीत बोलताना पटेल म्हणाले की, “माझ्या मते, प्रत्येकाने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात कुठेतरी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम केले पाहिजे. आदरातिथ्य आणि ग्राहक सेवेची पातळी समजून घेण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे आणि यामुळे तुमचे विचार करण्याची पद्धत बदलून जाते.”

अमेरिका आणि संघर्षाचे दिवस

ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या एका मुलाखतीत पटेल यांनी खुलासा केला की, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा वडिलांना आईला मारहाण करताना पाहिले, तेव्हा ते केवळ 8 वर्षांचे होते. 17 व्या वर्षी त्यांनी आईसह भारतातून अमेरिकेला पलायन केले. तिथे एका काकांनी त्यांना सुरुवातीला मदत केली.

अमेरिकेत त्यांनी आपले पोट भरण्यासाठी टायपिंगची कामे केली आणि टेबलांवर वेटर म्हणून सेवा दिली. अनेकदा हार मानण्याची इच्छा असतानाही, त्यांनी स्वतःला सांगितले की आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे आहे.

वेटर ते सिस्कोचे अधिकारी

वेटर म्हणून काम करतानाचा अनुभव सांगताना पटेल म्हणाले, “मला जाणवले की जर मी लोकांशी बोललो नाही आणि त्यांना चांगला अनुभव दिला नाही, तर मला टिप मिळणार नाही. आणि टिप मिळाली नाही, तर मी जास्त तास काम करूनही परतावा मिळत नाहीये.”

स्वतःला सिद्ध करण्याची हीच भूक त्यांना डॉक्युलाब्ज (Doculabs), ईएमस (आता डेल), बॉक्स (Box) आणि अखेरीस सिस्कोमध्ये (Cisco) घेऊन गेली. दोन दशकांहून अधिक काळ काम केल्यानंतर ते 2020 मध्ये सिस्कोमध्ये रुजू झाले.

“अनेकदा आपण आपला अहंकार आड आणतो आणि ‘मी स्वतःच्या बळावर यशस्वी झालो’ असे म्हणतो. पण ‘स्वतःच्या बळावर यशस्वी झालेला माणूस’ अशी कोणतीही गोष्ट नसते; आपण सर्वजण एका जोडलेल्या समाजात राहतो. त्यामुळे जर तुम्ही मोठ्या लोकांच्या खांद्यावर उभे राहू शकलात, तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता.”, असे ते म्हणतात.

जीतू पटेल सुरुवातीला बोलताना अडखळायचे. तरीही त्यांनी स्वतःला कंफर्ट झोनमधून बाहेर काढण्यासाठी, जाणीवपूर्वक ग्राहकांसमोर काम करण्याची वेटरची भूमिका स्वीकारली. स्वतःला सिद्ध करण्याची हीच भूक त्यांना डॉक्युलाब्ज (Doculabs), ईएमस (आता डेल), बॉक्स (Box) आणि अखेरीस सिस्कोमध्ये (Cisco) घेऊन गेली. दोन दशकांहून अधिक काळ काम केल्यानंतर ते 2020 मध्ये सिस्कोमध्ये रुजू झाले.

हे देखील वाचा – Donald Trump: ‘भारत-पाक दोन्ही देश…’; शहबाज शरीफ यांच्यासमोरच डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्त्वाचे विधान

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या