Home / महाराष्ट्र / Vasai-Virar Roads Potholes : रस्ते दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष?

Vasai-Virar Roads Potholes : रस्ते दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष?

Vasai-Virar Roads Potholes : सुरक्षित रस्ते (Roads) असणं कदाचित आता एक स्वप्नच राहिले आहे. मागच्या काही महिन्यांपासून वसई-विरार (Vasai-Virar-Roads) शहरातील...

By: Team Navakal
Vasai-Virar Roads Potholes

Vasai-Virar Roads Potholes : सुरक्षित रस्ते (Roads) असणं कदाचित आता एक स्वप्नच राहिले आहे.  मागच्या काही महिन्यांपासून वसई-विरार (Vasai-Virar-Roads) शहरातील सर्वच ठिकाणच्या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे असल्याचं दिसून येत आहे. मात्र या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे कायमच दुर्लक्ष केले जाते; त्यामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आल्यास दिसून येत आहे. त्यामुळे अपघाताच्या (Accident) मालिका देखील सुरु आहेत. याचबरोबर धूळ प्रदूषणाने ही जनतेची कोंडी होऊ लागली आहे. अशी स्थिती असतानाही रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.

असणं कदाचित आता एक स्वप्नच राहिले आहे.  मागच्या काही महिन्यांपासून वसई-विरार शहरातील सर्वच ठिकाणच्या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे असल्याचं दिसून येत आहे. मात्र या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे कायमच दुर्लक्ष केले जाते; त्यामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आल्यास दिसून येत आहे. त्यामुळे अपघाताच्या मालिका देखील सुरु आहेत. याचबरोबर धूळ प्रदूषणाने ही जनतेची कोंडी होऊ लागली आहे. अशी स्थिती असतानाही रस्त दुरुस्तीच्या कामासाठी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.

पाऊस आणि रस्त्यांवरील खड्डे हे जुने नाते आहे. मागील काही वर्षांपासून झपाट्याने विकसित होत असलेल्या वसई विरार शहरातील रस्त्यांची अवस्था मात्र अजूनही दयनीयच आहे. याचा वाहनचालकांना मात्र मोठा फटका बसतोय. खड्ड्यांमुळे वाहतूकीचा वेग कमी कमी झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी पर्यायाने वेळेची कमी यांसारख्या समस्या उत्भवत आहेत. तर काही वेळेला अपघातासारख्या मोठ्या आणि गंभीर घटना घडतात.

मागच्या काही वर्षाच्या तुलनेत वसई विरार शहरातील विविध भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आढळून आले आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामासाठी पालिकेकडून २० ते २५ कोटी रुपयांचे नियोजन देखील करण्यात आले होते. पाऊसाचे कारण देत रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने आजही खड्ड्यांची मालिका कायम आहे.


हे देखील वाचा –

Potholes on Road: खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास आता वारसांना मिळणार ६ लाखांची नुकसान भरपाई.. 

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या