Monkeypox Patient : कोरोनाकाळात (COVID19) राज्यात आरोग्य संबधित अनेक समस्या उत्भवत होत्या. आता धुळे (Dhule)जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला मंकीपॉक्सचा(Monkeypox Patient) रुग्ण आढल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर असल्याचं दिसून येत आहे. हा रुग्ण सौदी अरेबियातून धुळ्यातमध्ये आला. त्वचेसंबंधित त्रास जाणवल्याने त्याला तातडीने धुळे (Dhule) शहरातील एका रुग्णालयात दाखल केल. त्या ठिकाणी रुग्णाच्या तीन रक्त चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांच्या अहवालातून त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे समोर आलं आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संबंधित रुग्ण २ ऑक्टोबर २०२५ रोजी सौदी अरेबियातून धुळ्यामध्ये आला. पुण्यातील एनआयए प्रयोगशाळेने या चाचण्यांचा अहवाल दिल्यानंतर त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे निष्पन्न झाल आहे. या रुग्णाच्या संपर्कात अजून दोन व्यक्ती होते. संपर्कातील दोघांचीही चाचणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. डॉंक्टरांच्या माहितीनुसार, मंकीपॉक्स संक्रमित रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. हा आजार सुरुवातीला आफ्रिकेतून पसरला होता, परंतु; तातडीने वैद्यकीय उपचार सुरू केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होणारा आहे.

मंकीपॉक्सची लक्षणं पुढील प्रमाणे:
मंकीपॉक्सची लक्षणे ही साधारणपणे वायरल तापासारखी असतात. ताप, डोकेदुखी, स्नायू दुखी, थंडी वाजून येणे अशी लक्षणे या आजारात दिसून येतात. ही लक्षण साधारणतः तीन ते चार दिवस राहतात, त्यानंतर संपूर्ण शरीराच्या त्वचेवर पुरळ उठायला सुरवात होते. सगळ्यात आधी प्रामुख्याने पुरळं हातावर किंवा पायावर उठू शकतात, त्यानंतर या पुरळाचं रूपांतर मोठ्या फोडांमध्ये होत.
हे देखील वाचा –
Potholes on Road: खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास आता वारसांना मिळणार ६ लाखांची नुकसान भरपाई..