Home / News / Crime Diary : एकतर्फी प्रेमात तरुणाचा विकृतपणा; दिवसा-ढवळ्या तरुणीवर चाकूने वार..एकतर्फी प्रेमातून अजून एक बळी.

Crime Diary : एकतर्फी प्रेमात तरुणाचा विकृतपणा; दिवसा-ढवळ्या तरुणीवर चाकूने वार..एकतर्फी प्रेमातून अजून एक बळी.

Crime Diary : प्रेमाला काळिमा फासणारी घटना दिल्लीतील नंद नगरी भागात घडली आहे. विकृत पणाचा कळस गाठणारी अशी हि घटना...

By: Team Navakal
Crime Diary

Crime Diary : प्रेमाला काळिमा फासणारी घटना दिल्लीतील नंद नगरी भागात घडली आहे. विकृत पणाचा कळस गाठणारी अशी हि घटना आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने (Man)एका तरुणीवर (Young-Woman)चाकूने वार करत तिची निर्घृण हत्या (Killed)केली. आरोपीने तिच्यावर १२ पेक्षा अधिक वेळा चाकूने वार केले आहेत. स्थानिकांनी तरुणीला तात्काळ जवळच्या जीटीबी रुग्णालयात (Hospital) दाखल केलं, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, गुन्हे पथक आणि एफएसएलसह घटनास्थळी दाखल झाले. पथकाने घटनास्थळावरुन सगळे पुरावे गोळा केले. आरोपीलाही अटक करण्यात आली. पोलिसांना दिलेल्या सखोल माहितीनुसार, तरुणीच्या वडिलांनी सांगितले आरोपी त्यांच्या मुलीला वारंवार त्रास देत होता. मुलीने त्यांना याबद्दल पूर्व कल्पना देखील दिली होती. तरुणीच्या वडिलांनी आरोपींच्या आजी-आजोबांकडे याबाबतची तक्रारही केली होती. आरोपीच्या कुटुंबाने आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काही ऐकण्याच्या मनःस्थिती न्हवता.

तरुणी तिच्या कुटुंबियांसह नंद नगरी येथील सी-ब्लॉकमध्ये राहत होती. सोमवारी सकाळीच तरुणीचे वडील कामावर निघून गेले. तिची आई घरातील घरातील कामांमध्ये व्यस्त होती. सकाळी ०९:५० च्या सुमारास तरुणीने तिच्या आईला सांगितलं की ती समोसे खरेदी करायला जात आहे. दरम्यान, आरोपीने डी-ब्लॉकजवळ तरुणीवर हल्ला केला. तरुणीची आई घरातील काम करत असताना आरोपी तिच्या घरी आला आणि म्हणाला की तुमच्या मुलीला मी संपवून टाकलं आहे. जा तिचा मृतदेह ताब्यात घ्या. यानंतर, आरोपीने हँडपंपवर जाऊन हात-तोंड धुतले आणि मग त्याने पोलिसांत जाऊन आत्मसमर्पण केलं.

तरुणीच्या आईने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिला तात्काळ जीटीबी रुग्णालयात दाखल केले परंतु, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.

आरोपीने तरुणीवर १२ पेक्षा जास्त वेळा चाकूने वार केले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अलर्ट मोडवर आले . तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवागारात पाठवण्यात आला. आज शवविच्छेदन तपासणी करण्यात येईल. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


हे देखील वाचा –

Monkeypox Patient : महाराष्ट्रात सापडला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण? आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या