Chewing Food 32 Times : लहानपणी अनेकदा आपने आई वडील(Mother-Father)आजी आजोबा अनेक निरोगी सवय लावायचा प्रयत्न करतात किंवा मग त्याचे फायदे(Benifis) सांगतात पण लहानपणी खरच आपण त्या गोष्टी आचरणात आणतो का हो? पण या सवईनंचा फायदा मात्र आपल्याला आता होतो आहे. लहानपणी (Childhood) बऱ्याचदा “घास नीट चावा आणि मग गिळा”, अश्या प्रकारचा सल्ला आपल्यापैकी अनेकांना मिळाला असेल. त्यावेळी तो सल्ला कंटाळवाणा आणि अतिशय रटाळ वाटायचा; पण या वरती आता काही तत्ज्ञांनी मात्र अधिक माहिती दिली आहे. काही तज्ञांच्या मते हा सल्ला फक्त जेवणापुरताच मर्यादित राहत नाही. यामुळे आपल्या शरीरात बरेच बदल होतात. हा सल्ला शरीरासाठी अत्यंत लाभलादायक आहे. आजकालच्या फास्ट आणि फॉरवर्डच्या जगात लोक हा फॉर्मुला जेवणातही वापरू लागली आहेत. घाईघाईत जेवण, बरीच लोक तर जेवण चावत देखील नाही सरळ गिळतात याने पचनक्रियेवर आणि शारीरिक नाकारात्मकतेवर मोठा परिमाण देखील होऊ शकतो. आयुर्वेदानुसार जेवणाचा प्रत्येक घास जवळजवळ ३२ वेळा चावून खलला पाहिजे. अन्नपदार्थ पटपट खाल्ल्यास त्यातील पोषणतत्त्व शोषून घेण्यास शरीराला पुरेसा वेळ मिळत नाही. जर आपण अन्न हळूहळू खाल्ले, तर मेंदूला पोट भरल्याचे संकेत वेळेत मिळतात. आणि परिणामी जास्त खाल्ले जाण्याची शक्यता कमी होते, म्हणजेच जितकी आपल्याला भूक आहे तितकंच खाल जात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. व्यवस्थित एक घास चावून खाल्ल्यास भुकेवर नियंत्रण ठेवणारे हार्मोन्स संतुलित राहतात, ज्यामुळे शरीराच वजन संतुलन देखील टिकून राहते.
जेवणाचा प्रत्येक घास नीट चावून खाल्यास पचन सुधारते. पटापट जेवण केल्यास या नैसर्गिक एंझाइम्सची कार्यक्षमता हळूहळू कमी होते, ज्यामुळे गॅस, अॅसिडिटी आणि पोट फुगण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

३२ वेळा घास चावल्याचे फायदे:
वजन नियंत्रणात राहते. हळूहळू खाल्ल्याने अति खाणे देखील टाळता येते. यामुळे पचनप्रक्रिया सुधारते. यामुळे गॅस आणि अॅसिडिटी सारख्या समस्या देखील दूर होतात. नीट खाल्ल्यामुळे हृदयासंबंधीत समस्या उत्भवत नाहीत. तत्ज्ञांच्या सल्यानुसार आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत घाई करून खाल्लेले जेवण आपल्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. त्यामुळे पुन्हा कधीही जेवताना आरामात संयमाने एक एक घास खा, आणि प्रत्येक घासाचा लाभ मिळवा.
हे देखील वाचा –