Home / देश-विदेश / Haryana Police : हरयाणापोलिस विभागात आत्महत्येची मालिका;अजून एका पोलिस निरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या..

Haryana Police : हरयाणापोलिस विभागात आत्महत्येची मालिका;अजून एका पोलिस निरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या..

Haryana Police : हरयाणा पोलिस (haryana) विभागातून आत्महत्येची आणखी एक मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे. रोहतक येथे सायबर सेलमध्ये...

By: Team Navakal
Haryana Police

Haryana Police : हरयाणा पोलिस (haryana) विभागातून आत्महत्येची आणखी एक मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे. रोहतक येथे सायबर सेलमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या(ASI Commits Suicide) केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनास्थळावरुन तीन पानांची सुसाईड नोट आणि एक व्हिडिओ मेसेज मिळाला आहे. हरियाणा आयपीएस अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात, आणखी एका आत्महत्येने नवा ट्विस्ट उघड केला आहे.
मृत एएसआयने आपल्या चिठ्ठीत दिवंगत IPS अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्यावर गंभीर असे भ्रष्टागचार आणि जातीयवादाचे आरोप केले आहेत.
हरियाणाचे आयपीएस अधिकारी वाय पुरण कुमार यांच्या आत्महत्येच्या तपासात एक मोठा ट्विस्ट आला आहे, ज्यामध्ये त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. रोहतकच्या सायबर सेलमध्ये सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले संदीप कुमार हे वाय पुरण कुमार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करत होते.

चिठ्ठीत नेमकं काय?
मृत एएसआयने आपल्या चिठ्ठीत लिहिले की, “मी संदीप कुमार, मी आयुष्यभर सत्याचा मार्ग धरला, माझे आजोबा देखील देशासाठी लढले. देशभक्ती माझ्या रक्ता रक्तात भिनली आहे. मी भगतसिंग यांना माझा आदर्श मानतो, कारण त्यांनी देशासाठी आपले प्राण पणाला लावले त्यांनी देशाला जागवले. पुढे ते म्हणतात त्यांनी “सत्यासाठी” आपले जीवन अर्पण करत आहे.

संदीप कुमार यांनी रोहतकमधील एका शेतात त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी एक व्हिडिओ आणि तीन पानांची सुसाईड नोट मागे सोडली आहे. सुसाईड नोटमध्ये एएसआयने दिवंगत आयपीएस वाय. पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. संदीप कुमार यांनी आरोप केला आहे की वाय पुरण कुमार हे “भ्रष्ट पोलिस” होते आणि त्यांचा कथित भ्रष्टाचार उघडकीस येईल या भीतीने त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी असाही आरोप केला आहे की आयपीएस अधिकाऱ्याने जातीय भेदभावाच्या मुद्द्याचा वापर करून व्यवस्था हायजॅक केली.’ भ्रष्टाचाराचे आरोप समोर आल्यानंतर वाय. पूरण कुमार यांची बदली करण्यात आली, असे देखील या पोलिस अधिकाऱ्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ संदेशात संदीप कुमार म्हणाले की, वाय. पूरण कुमार यांची रोहतक रेंजमध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्यांच्या जागी भ्रष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली. “या लोकांनी फाइल्स ब्लॉक केल्या, याचिकाकर्त्यांना बोलावले आणि पैसे मागून त्यांचा मानसिक छळ केला. सध्या हे प्रकरण चांगलंच तापले असून, पूरन कुमार यांच्या पत्नी आणि IAS अधिकारी अमनीत पी. कुमार यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.


हे देखील वाचा –

Farmers Loss : फुलांचे उत्पादन घटले; फुलांच्या शेतीतून उत्पादन खर्चही निघत नाही..

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या