Maruti Dzire Price: मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने ऑक्टोबर महिन्यात आपली देशातील नंबर 1 कार डिझायर वर आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. या महिन्यात ही कार खरेदी केल्यास ग्राहकांची हजारो रुपयांची बचत होईल. विशेष म्हणजे, डिझायर गेल्या 4 महिन्यांत 3 वेळा देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे.
नवीन जीएसटी 2.0 दर लागू झाल्यानंतर ही कार खरेदी करणे आणखी स्वस्त झाले आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 6,83,999 रुपयांवरून कमी होऊन 6,25,600 रुपये झाली आहे. यामुळे ग्राहकांना थेट 87,700 रुपयांपर्यंतचा फायदा मिळत आहे.
विशेष म्हणजे, ही मारुतीची पहिली अशी कार आहे, जिला ग्लोबल NCAP आणि BNCAP मध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.
Maruti Dzire: फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
नवीन डिझायर काही विशिष्ट फीचर्समुळे लक्ष वेधून घेते:
बाह्य डिझाइन:
- आक्रमक फ्रंट बंपर
- हॉरिझॉन्टल डीआरएल सह स्टायलिश एलईडी हेडलाईट्स
- पुन्हा डिझाइन केलेले फॉग लॅम्प हाउसिंग
- शार्क फिन ॲन्टेना आणि बूट लीड स्पॉयलर
- क्रोम स्ट्रिपने जोडलेल्या Y-आकाराच्या एलईडी टेललाईट्स
आतील भाग आणि फीचर्स:
- बेज आणि ब्लॅक थीम
- डॅशबोर्डवर फॉक्स लाकडी ॲक्सेंट
- अॅनालॉग ड्रायव्हर डिस्प्ले
- क्रूझ कंट्रोल
- ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो साठी वायरलेस कंपॅटिबिलिटीसह 9-इंच टचस्क्रीन
- मागील बाजूस व्हेंट्ससह एअर कंडिशनिंग आणि सिंगल-पॅन सनरूफ
सुरक्षा फीचर्स:
- 6 एअरबॅग्स (स्टँडर्ड)
- रिअर पार्किंग सेन्सर्स
- इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल
- 360-डिग्री कॅमेरा (या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच).
इंजिन आणि व्हॅरियंट
नवीन डिझायरमध्ये स्विफ्ट मधून घेतलेले 1.2-लिटर 3-सिलेंडर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 80bhp ची कमाल शक्ती आणि 112Nm चा पीक टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा एएमटी ट्रान्समिशनसह जोडलेले आहे.
ही कार LXi, VXi, ZXi आणि ZXi Plus या व्हॅरियंट्समध्ये बाजारात आणली जाईल. ही मारुती कंपनीची पहिली अशी कार आहे, ज्याला ग्लोबल NCAP मध्ये सुरक्षेसाठी 5-स्टार रेटिंग मिळाले आहे.
हे देखील वाचा – 300 कोटींची कमाई करणारा चित्रपट लवकरच OTT वर; या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज