Home / लेख / आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत मिळतोय iPhone 16; खरेदीवर होईल हजारो रुपयांची बचत

आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत मिळतोय iPhone 16; खरेदीवर होईल हजारो रुपयांची बचत

iPhone 16 Offer: फ्लिपकार्टवर सध्या बिग बँग दिवाळी सेल सुरू असून, यामध्ये अनेक स्मार्टफोन अत्यंत कमी किमतीत उपलब्ध झाले आहेत....

By: Team Navakal
iPhone 16 Offer

iPhone 16 Offer: फ्लिपकार्टवर सध्या बिग बँग दिवाळी सेल सुरू असून, यामध्ये अनेक स्मार्टफोन अत्यंत कमी किमतीत उपलब्ध झाले आहेत. केवळ अँड्रॉइड फोनच नव्हे, तर ॲपलचे आयफोनदेखीलया सेलमध्ये स्वस्त झाले आहेत. विशेषतः, जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नवीन आयफोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही संधी गमावू नका.

या सेलमध्ये आयफोन 16 वर पुन्हा एकदा आकर्षक सूट मिळत आहे. या फोनची मूळ किंमत सुमारे 70 हजार रुपये आहे, परंतु सेलदरम्यान तुम्ही तो 60 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.

या ॲपल डिव्हाइसची खास गोष्ट म्हणजे, यात एआयफीचर्स आहेत, जे जुन्या मॉडेल्समध्ये उपलब्ध नाहीत. तसेच, फोनमध्ये इतरही अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

iPhone 16: सूट आणि ऑफर्स

ॲपलने आयफोन 16 गेल्या वर्षी 79,900 रुपयांना बाजारात लाँच झाला होता. मात्र, आयफोन 17 सिरीज लॉन्च झाल्यानंतर कंपनीने या जुन्या मॉडेलची किंमत 10 हजार रुपयांनी कमी केली, ज्यामुळे त्याची किंमत 69,900 रुपये झाली.

आता फ्लिपकार्टच्या बिग बँग दिवाळी सेलमध्ये या फोनची किंमत आणखी कमी झाली आहे. या सेलदरम्यान तुम्ही हा फोन केवळ 57,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. म्हणजेच, यावर हजारो रुपयांचा थेट डिस्काउंट मिळत आहे.

याशिवाय फोनवर अनेक बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे ही डील अधिक आकर्षक बनते. एसबीआय क्रेडिट कार्ड ईएमआय वापरल्यास 1,250 रुपयांपर्यंत सूट मिळते, तर फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास 4,000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते.

iPhone 16: फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

आयफोन 16 च्या खास फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, या डिव्हाइसमध्ये 6.1-इंच आकाराचा 2556×1179 रिझोल्यूशन असलेला सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले आहे. तसेच यात डायनॅमिक आयलँड फीचर देण्यात आले आहे.

या डिव्हाइसची पीक (Peak) (बाहेरील) ब्राइटनेस 2000 निट्स पर्यंत आहे. यात एचडीआर सपोर्ट, ट्रू टोन आणि वाइड कलर देखील मिळतो. फोनमध्ये ए18 चिप वापरण्यात आली आहे, जी 6-कोर सीपीयू, 5-कोर जीपीयू आणि 16-कोर न्यूरल इंजिनने सुसज्ज आहे.

या डिव्हाइसमध्ये डुअल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 48MP चा फ्यूजन मेन कॅमेरा आहे. 12MP चा अल्ट्रा वाइड (अल्ट्रा वाइड, f/2.2, 120 अंशांचे फील्ड ऑफ व्ह्यू) कॅमेरा, मॅक्रो फोटोग्राफी, 2x ऑप्टिकल झूम इन/आऊट आणि 10x पर्यंत डिजिटल झूम आहे. समोरचा कॅमेरा 12MP चा ट्रूडेप्थ (f/1.9) असून तो फेस आयडी, ॲनिमोजी आणि नाईट मोड सह येतो.

हे देखील वाचा – 300 कोटींची कमाई करणारा चित्रपट लवकरच OTT वर; या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या