Attempted Rape : डोंबिवलीत (Dombivli) अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर (Minor girl) तिच्याच घरात तिच्यावर अत्याचार करणायचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तिच्याच घरात भाड्याने राहणाऱ्या ३७ वर्षीय नराधमाने तिच्यावर विनयभंग करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या बिकट परिस्थितीतही १६ वर्षीय मुलीने दाखवलेल्या धाडसी हिंमतीमुळे नराधम चांगलाच तोंडघशी पडला आहे.
नेमक प्रकरण काय ?
आरोपी हा पीडित मुलीच्या घरी डोंबिवलीतील आयरे गावात तिच्याच घरी भाड्याने राहत होता. आरोपीने घरात अल्पवयीन मुलगी एकटी असल्याची संधी साधत तिच्यावर विकृत हेतूने जबरदस्ती करत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र अल्पवयीन मुलगी त्या नराधमाला न जुमानता पर्यायाने त्याला न घाबरता अभूतपूर्व अस धाडस दाखवल आहे. तिने आपल्या पूर्ण ताकदीनिशी नराधमाचा जोरदार विरोध करून त्याला प्रतिकार केला. मुलीने केलेल्या या धाडसानंतर तो नराधम घाबरला. याचाच फायदा घेऊन मुलीने त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. यानंतर तिने जोरजोरात आरडाओरड कार्याला सुरवात केली.
या घटनेची माहिती तिच्या कुटुंबियांना मिळताच कुटुंबियांनी तातडीने मुलीला घेऊन डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली
यानंतर आरोपीविरोधात पॉस्को अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रामनगर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरवात केली.
पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ आरोपीला जेरबंद केल. पोलिसांनी या नराधमाविरोधात पॉस्को (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या धाडसी मुलीच्या प्रतिकारामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. तिच्या हिंमतीमुळे तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हे देखील वाचा – Mumbai Metro 3 : मुंबई मेट्रो ३ च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी..