Home-Decor : आजकाल DIY चा जमाना आला आहे. त्यामुळे प्रत्यक लहान मोठ्या गोष्टीत हा तुमचा टच असतोच. दिवाळीही काही लोक स्वतः कंदील बनवून लावतात आणि आता वेगेगळ्या पणत्यांचा ट्रेण्ड देखील आला आहे. दिवाळीचा सण केवळ प्रकाश आणि रंगाचे प्रतीक नाही तर घराला वाईट ऊर्जान पासून दूर ठेव्यासाठी केलेल्या प्रार्थनांचा सण आहे. या काळात घर दिव्यांनी उजळून निघत. म्हणूनच, आपण बाजारातून विविध प्रकारचे दिवे खरेदी करतो आणि घराचा प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी आणि घरात अखंड प्रकाश तेवत राहावा यासाठी त्यांचा वापर करतो. ट्रेंडिंग दिवे कसे बनवायचे याचे अनेक व्हिडीओ सध्या सोसिअल मीडियावर वायरल होताना दिसत आहेत. बऱ्याचदा दिवे लावण्यासाठी तेल किंवा तूप वापरले जाते. पण जर तुम्हाला कमी खर्चात तुमचे घर दिव्यांनी सजवायचे असेल, तर यावेळी, काही सोप्या DIY युक्त्या तुम्ही करून पहा. तुम्ही तेलाशिवाय दिवे लावू शकता आणि तुमचे घर तासनतास प्रकाशित ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी लहान काचेची छोटीशी अशी वाटी घ्यायांची आहे. त्यात पाणी भरा, आणि वरच्या बाजूला थोडी जागा सोडा, सुमारे एक इंच तुम्ही यात खरी छोटी फुल देखील ठेवू शकता.
नंतर, चमच्याच्या साहाय्याने, पाण्यात तेलाचे काही थेंब टाका त्यानंतर हे तेल पृष्ठभागावर तरंगेल आणि दिव्याला थोड्याफार प्रमाणात चमक देईल. आता, पारदर्शक प्लास्टिक रॅपर घ्या आणि कात्रीने लहान गोल आकार कापून घ्या. अगरबत्तीच्या टोकाने या गोल तुकड्यांच्या मध्यभागी एक छोटस छिद्र करा आणि आत कापसाची वात घाला.
आता या लहान वात काळजीपूर्वक पाण्यावर ठेवा. त्या तरंगतील आणि अतिशय सुंदर दिसतील.शेवटी वातीला माचीस किंवा लायटरने पेटवा आणि तुमचे घर रंगीबेरंगी दिव्यांनी उजळवून टाका. परंतु घरात लहान मुले असल्यास सावधगिरी बाळगणे चांगले. या दिव्यांच्या DIY बद्दलचे अनेक व्हिडीओ तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील.
हे देखील वाचा – Bus Fire : जैसलमेरमध्ये अग्नितांडव; आगीत २० जणांचा मृत्यू