Pankaj Dheer Passes Away : अभिनेता पंकज धीर(Pankaj Dheer) यांनी वयाच्या अवघ्या ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांनी बी.आर. चोप्रा यांच्या लोकप्रिय टीव्ही शो महाभारतमध्ये (Mahabhart)उदार कर्णाची अप्रतिम भूमिका साकारली होती. ते बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंजत देखील होते.
पंकज धीर यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून आपल्या कामाची छाप सोडली आहे. ते चंद्रकांता, युग, द ग्रेट मराठा आणि बढ़ो बहू या सारख्या प्रसिदध मालिकांमध्ये दिसले. त्यांनी आशिक आवारा, सडक, सोल्जर आणि बादशाह सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
पण १९८३ मध्ये जेव्हा त्यांनी पहिला भारतीय अश्लील सिनेमा “बॉम्बे फॅन्टसी” प्रदर्शित केला तेव्हा बरीच खळबळ देखील उडाली होती. ‘बॉम्बे फॅन्टसी’चं दिग्दर्शन पंकज धीर यांनी केल होतं, तर प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक मजहर खान यांनी या सिनेमाची निर्मिती केली होती.

वृत्तानुसार, अभिनेता पंकज धीर यांच्यावर आज मुंबईतील विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती आहे. त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र, तसेच इंडस्ट्रीतील कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जात आहेत.
काही माध्यमांच्या माहिती नुसार, पंकज धीर यांना कर्करोग झाला होता, पण मोठ्या धीरानं कर्क रोगाशी लढा देऊन ते बरेही झालेले. पण, अवघ्या काही महिन्यांतच कर्क रोगाशी त्यांचा पुन्हा सामना झाला आणि त्यांचं निधन झालं. बराच काळ ते कर्करोगाशी झुंज देत होते त्यांची हि झुंज अखेर अपयशी पडली. त्यांची प्रकृती गंभीर होती. पंकज यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
हे देखील वाचा – Home-Decor : आता घरीच बनवा दिवाळीसाठीचे ट्रेंडिंग दिवे; तेल न वापरता बनवा दिवे..