NHAI FASTag Reward: तुम्ही जर वारंवार राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करत असाल आणि टोल प्लाझावरील अस्वच्छ शौचालयांमुळे त्रस्त असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची आणि फायद्याची बातमी आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) स्वच्छतेसाठी एक अनोखी योजना आणली आहे.
या नव्या उपक्रमांतर्गत, टोल प्लाझावरील अस्वच्छ शौचालयाची तक्रार करणाऱ्या प्रवाशांना 1,000 रुपयांचा FASTag रिचार्ज बक्षीस म्हणून मिळणार आहे.
‘स्वच्छता अभियानाचा’ (Cleanliness Drive) भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा उद्देश महामार्गांवर स्वच्छता आणि सुविधा सुधारणे हा आहे. ही योजना 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत वैध राहणार आहे.
1,000 रुपयांचे FASTag बक्षीस मिळवण्याची प्रक्रिया
- या बक्षिसावर दावा करण्यासाठी प्रवाशांना ‘राजमार्ग यात्रा’ (RajmargYatra) ॲपचे लेटेस्ट व्हर्जन वापरावे लागेल.
- फोटो अपलोड करा: शौचालयाचे जिओ-टॅग केलेलेआणि वेळेची नोंद असलेले स्पष्ट फोटो ॲपवर अपलोड करा.
- माहिती भरा: आपले नाव, ठिकाण, वाहनाचा नोंदणी क्रमांक (VRN) आणि मोबाईल क्रमांक ॲपमध्ये भरा.
- तपासणी: तक्रारींची आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने तपासणी केली जाईल. फोटोमध्ये फेरफार आढळल्यास किंवा तक्रार डुप्लिकेट आढळल्यास ती फेटाळली जाईल.
Under the ‘Special Campaign 5.0’, NHAI has launched a unique drive ‘Clean Toilet Picture Challenge’, which encourages National Highway users to report a dirty toilet at Toll Plazas on National Highway.
— NHAI (@NHAI_Official) October 13, 2025
➡️The initiative is open to all National Highway users for reporting dirty… pic.twitter.com/MViotpnaaq
महत्त्वाचे नियम
- बक्षीस मर्यादा: प्रत्येक वैध तक्रारीसाठी 1,000 रुपययांचा FASTag रिचार्ज दिला जाईल.
- एकदाच लाभ: संपूर्ण मोहिमेदरम्यान, प्रत्येक वाहन नोंदणी क्रमांकाला फक्त एकदाच बक्षीस मिळू शकते.
- पात्र शौचालये: केवळ NHAI ने बांधलेली चालवलेली किंवा देखरेख केलेली शौचालयेच या योजनेत समाविष्ट आहेत. पेट्रोल पंप किंवा धाब्यांवरील शौचालये यामध्ये नाहीत.
- स्थानानुसार मर्यादा: एकाच शौचालयाच्या ठिकाणी एका दिवसात अनेक तक्रारी आल्या तरी, केवळ पहिल्या वैध तक्रारीलाच बक्षीस मिळेल.
NHAI ला आशा आहे की हा नाविन्यपूर्ण उपक्रम भारतातील राष्ट्रीय महामार्गांवरील स्वच्छता आणि वापरकर्त्यांचा अनुभव लक्षणीयरीत्या सुधारेल.
हे देखील वाचा – Commonwealth Games: भारतासाठी मोठी संधी! 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी अहमदाबाद शहराची शिफारस