Home / लेख / सरकारी कंपनीची खास ऑफर! फक्त 1 रुपयात महिनाभर मोफत मिळणार हायस्पीड इंटरनेट सेवा

सरकारी कंपनीची खास ऑफर! फक्त 1 रुपयात महिनाभर मोफत मिळणार हायस्पीड इंटरनेट सेवा

BSNL 4G Offer: सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनी BSNL ने नवीन ग्राहकांसाठी एक मोठी आणि आकर्षक घोषणा केली आहे. कंपनीने 15...

By: Team Navakal
BSNL 4G Offer

BSNL 4G Offer: सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनी BSNL ने नवीन ग्राहकांसाठी एक मोठी आणि आकर्षक घोषणा केली आहे. कंपनीने 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत एक महिना 4G सेवा पूर्णपणे मोफत देण्याची विशेष ऑफर आणली आहे.

या ‘दिवाळी बंपर ऑफर’ (Diwali Bonanza) अंतर्गत नवीन ग्राहकांना संपूर्ण महिनाभर 4G सेवेचा आनंद घेण्यासाठी केवळ 1 रुपया इतके टोकन शुल्क भरावे लागेल.

ग्राहकांना कंपनीने स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या 4G नेटवर्कचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने ही ऑफर देण्यात आल्याचे BSNL ने स्पष्ट केले आहे. पहिल्या 30 दिवसांसाठी ग्राहकांना कोणतेही सेवा शुल्क भरावे लागणार नाही.

BSNL 4G Offer: नवीन ग्राहकांना BSNL च्या ऑफरमध्ये काय मिळणार?

या ऑफर कालावधीत नवीन कनेक्शन घेणाऱ्या BSNL ग्राहकांना खालील सुविधा मिळतील:

  • संपूर्ण भारतात अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स
  • दररोज 2GB हाय-स्पीड डेटा
  • दररोज 100 एसएमएस (SMS)
  • मोफत सिम कार्ड (Free SIM Card)

या प्लॅनमुळे यूजर्सला अनलिमिटेड कॉल्स आणि दैनंदिन हाय-स्पीड डेटाचा आनंद घेता येईल, तसेच BSNL च्या 4G सेवा आणि नेटवर्क कव्हरेजचा अनुभव घेता येईल.

नवीन ग्राहक त्यांच्या जवळच्या BSNL स्टोअरला भेट देऊन किंवा 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान ऑनलाइन नोंदणी करून या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

मागील ऑफरने वाढवली ग्राहकसंख्या

BSNL ने ऑगस्ट 2025 मध्ये अशीच एक ऑफर दिली होती, ज्यामुळे त्यांच्या ग्राहकसंख्येत लक्षणीय वाढ झाली. त्या काळात 1.38 लाखाहून अधिक नवीन ग्राहक जोडून, BSNL ने नवीन ग्राहक जोडण्याच्या बाबतीत Airtel ला मागे टाकून दुसरे स्थान मिळवले होते.

कंपनीचे मोठे उद्दिष्ट

BSNL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए रॉबर्ट जॉन रवी यांनी विश्वास व्यक्त केला की, BSNL ब्रँडशी जोडलेली गुणवत्ता, कव्हरेज आणि विश्वासामुळे ग्राहक 30 दिवसांचा मोफत कालावधी संपल्यानंतरही सेवा सुरू ठेवण्यास प्रोत्साहित होतील. या ‘दिवाळी बंपर ऑफर’ मुळे उत्सवाच्या काळात ग्राहकांना कंपनीच्या स्वदेशी 4G नेटवर्कचा अनुभव घेण्याची उत्तम संधी मिळेल, असे रवी म्हणाले.

हे देखील वाचा – 1,000 रुपयांचा FASTag रिचार्ज जिंका! हायवेवरून प्रवास करताना केवळ करा ‘हे’ काम; NHAI ची अनोखी योजना

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या