Home / देश-विदेश / Hina Khan : मुस्लिम महिला पोलीस अधिकाऱ्याने दिला ‘जय श्रीराम’ चा नारा..

Hina Khan : मुस्लिम महिला पोलीस अधिकाऱ्याने दिला ‘जय श्रीराम’ चा नारा..

Hina Khan : एका मुस्लीम महिला पोलीस अधिकाऱ्याने ‘जय श्रीराम’ (Jai Shri Ram Slogan)असा नारा दिल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर वाऱ्यासारखा...

By: Team Navakal
Hina Khan

Hina Khan : एका मुस्लीम महिला पोलीस अधिकाऱ्याने ‘जय श्रीराम’ (Jai Shri Ram Slogan)असा नारा दिल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर वाऱ्यासारखा पसरत आहे. या महिला पोलीस अधिकाऱ्याने ( Police Officer)संतप्त आंदोलकांना शांत केलं. त्याच्या या कर्तव्यदक्षतेचं(Duty)सगळीकडे कौतुक केलं जात आहे.

प्रकरण नेमकं काय?
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यावरून काही दिवसांपासून जोरदार वाद सुरू आहे. आणि आता त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर हे प्रकरण अधिक मोठं झालं. याप्रकरणी मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर शहरातील एका वकिलावर दोन दिवसांपूर्वी एफआयआर दाखल केली होती. या कारवाईचा निषेध करण्यासाठी वकिलांच्या एका गटाने सोमवारी सायंकाळी फूलबाग परिसरातील मंदिरात एका मंदिरात सुंदरकांड पठण करण्याचा निर्णय घेतला होता. परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेत परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून ग्वाल्हेर शहराच्या पोलीस अधिकारी हिना खान आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या.

परिसरात जमावबंदीचे आदेश असल्याने तुम्हाला एकत्र जमण्यास परवानगी नाही असे त्यांनी स्पष्टपणे वकिलांना सांगितले. हिना खान याचे म्हणे ऐकून काही वकील मात्र आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. वकील अनिल मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील गटाने हिना खान चांगलेच सुनावले. वकील म्हणाले ‘तुम्ही सनातन धर्माच्या विरोधात आहात’ असे म्हणत जय श्रीराम अशी घोषबाजी वकिलांच्या गटाने सुरू केली. या घटनेमुळे परिसरात जबरदस्त असा तणाव निर्माण झाला होता.

परंतु प्रसंगावधान पाहून, हिना खान यांनी अत्यंत संयमाने ही परिस्थिती हाताळली. त्यांनी देखील जमावासोबत स्वतः चार वेळा ‘जय श्री राम’ असा नारा दिला. वकिलांच्या जमावाला शांत राहण्याचे आवाहन देखील केले. परंतु काहीजण पोलिसांसोबत अजूनही हुज्जत घालत होते. त्यावर हिना खान यांनी सडेतोड उत्तर दिले.“जर तुम्ही जय श्रीरामचा नारा देत असाल तर मीदेखीन देईन; पण, हा नारा फक्त माझ्यावर दबाव टाकण्यासाठी असेल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहेत”, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या साहसी भूमिकेमुळे संतप्त वकिलांचा गट शांत झाला आणि परिस्थिती नियंत्रणात येण्यात मदत मिळाली. माध्यमांशी बोलताना हिना खान म्हणाल्या, “जय श्रीरामचा नारा देणे ही माझ्या मनातून आलेली एक भावना होती. त्यावेळी संतप्त झालेल्या वकिलांना शांत करणे तेव्हा मला अत्यंत गरजेचे होते. आंदोलनकर्ते आक्रमक झाले असते तर परिस्थिती अजून चिघळली असती. असं त्या म्हणाल्या.

हिना खान यांच्याबद्दल थोडी माहिती..

हिना खान यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. २०१२ मध्ये त्यांची विक्रीकर निरीक्षक म्हणून निवडही झाली; पण पोलीस अधिकारी होण्याच्या स्वप्नाने झपटलेल्या हिना खान यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर २०१६ मध्ये हिना यांनी मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची (MPPSC) परीक्षा उत्तीर्ण केली. २०१८ मध्ये त्यांनी पोलीस उपअधीक्षक पदाचा कार्यभार देखील स्वीकारला. सध्या त्या ग्वाल्हेर शहरात आपले कर्तव्य बजावत आहेत.


हे देखील वाचा – Flood Affected Talukas : पूरग्रस्त तालुक्यांसाठी केलेली मदत स्वार्थी कि निस्वार्थी?आपत्तीग्रस्त तालुके जाहीर होताच सत्ताधारी पक्षात नाराजीचे सूर का?

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या