Home / राजकीय / Ban Hindi : हिंदी फलक , चित्रपट, गाण्यांवर तामिळनाडूत बंदीचे विधेयक येणार

Ban Hindi : हिंदी फलक , चित्रपट, गाण्यांवर तामिळनाडूत बंदीचे विधेयक येणार

Ban Hindi : तामिळनाडू राज्य सरकारने (Tamil Nadu Government)राज्यात सार्वजनिक ठिकाणी हिंदी फलक (Hindi signboards), चित्रपट (films)व गीतांवर (songs) बंदी...

By: Team Navakal
Ban Hindi


Ban Hindi : तामिळनाडू राज्य सरकारने (Tamil Nadu Government)राज्यात सार्वजनिक ठिकाणी हिंदी फलक (Hindi signboards), चित्रपट (films)व गीतांवर (songs) बंदी आणणारे विधेयक मांडण्याचा निर्णय घेतला आहे. यादृष्टीने राज्याच्या कायदेतज्ज्ञांची एक तातडीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये या नव्या विधेयकाच्या कायदेशीर वैधतेबाबत चर्चा करण्यात आली.

या नव्या विधेयकाच्या मसुद्यात राज्यात हिंदीतून जाहिराती (Advertisements), सिनेमागृहातील हिंदी सिनेमांचे पोस्टर व राज्यात हिंदी गाण्यांच्या प्रक्षेपणावर बंदी घातली जाणार आहे. तामिळनाडूत पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections in)पार्श्वभूमीवर हे विधेयक आणले जाणार असून यातून मुख्यमंत्री स्टॅलिन (Chief Minister Stalin)प्रांतीय अस्मितेची खेळी खेळत आहेत.

ज्येष्ठ द्रमुक नेते टीकेएस इलागोवन (TKS Elangovan) यांनी म्हटले की, आम्ही या निर्णयाने देशाच्या संविधानाचे कोणतेही उल्लंघन करत नाही. आम्ही केवळ हिंदीच्या सक्तीला विरोध करत आहोत. या विधेयकाला तामिळनाडूतील भाजपा नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. भाजपा प्रवक्ते विनोज सेल्वम (BJP spokesperson Vinoj Selvam) यांनी म्हटले की, हा संकुचित विचार असून भाषेवर बंदी आणून ते सध्याच्या प्रश्नांकडून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रालाही तामिळनाडूत जोरदार विरोध करण्यात आला होता. त्यासाठी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राज्याचे स्वतःचे शैक्षणिक धोरण तयार केले. त्यांनी रुपयाचे हिंदी भाषेतील चिन्हही तामिळ भाषेत केले आहे.


हे देखील वाचा 

आमदार गायकवाडना झटका कॅन्टीनचे जेवण उत्तमच होते

कैद्याला फाशी ऐवजी विषारी इंजेक्शन केंद्राचा पर्याय देण्यास विरोध का ? सुप्रीम कोर्टाचा सवाल

मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या