Home / आरोग्य / Hair Care Tips : कोरफड केसांवर थेट लावू शकतो का?

Hair Care Tips : कोरफड केसांवर थेट लावू शकतो का?

Hair Care Tips : कोरफड (Aloe vera) हे पूर्वापार चालत आलेले औषध आहे. केसगळती (Hair loss),चेर्यावरील डाग यामुळे सहजपणे निघून...

By: Team Navakal
Hair Care Tips

Hair Care Tips : कोरफड (Aloe vera) हे पूर्वापार चालत आलेले औषध आहे. केसगळती (Hair loss),चेर्यावरील डाग यामुळे सहजपणे निघून जातात. पण अजूनही बऱ्याच जणांना याबद्दल बरेच प्रश्न देखील असतात. केसांना कोरफड (Aloe vera) कशी लावावी यावरून बऱ्याच महिलांचा गोंधळ उडालेला असतो. कोरफड केसांवर थेट लावली तर त्यांच्या कोणता उलट परिणाम तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न उत्भवतात पण बऱ्याच माध्यमांनी यावर स्प्ष्टता या आधीच दिली आहे. तसेच बऱ्याच डॉक्टरानी देखील यावर पुष्टी केली आहे.

कोरफड लावताना तुम्हाला त्यात कोणतेही इतर केमिकल एकत्रित करून लावण्याची आवश्यकता नाही , तुम्ही थेटहि ती केसांवर लावू शकता. अ‍ॅलोव्हेरामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन B12 हि पोषणतत्त्वे केसांच्या मुळापर्यंत जाऊन केस मुलायम ठेवतात.

शिवाय केसांचा कोरडेपणा दूर होऊन स्कॅल्पची त्वचा निरोगी राहण्यास देखील मदत मिळते. तुम्ही केसगळती, कोंडा आणि केस तुटणे या समस्यांमुळे जर त्रस्त असाल तर कोरफड हा तुमच्यासाठी एक योग्य पर्याय असू शकतो.

कोरफड कश्या पद्धतिने केसांना लावावी?

सर्वप्रथम कोरफडीचे एक ताजे पान काढा आणि ते मधोमध कापा. आतील गर मिक्समध्ये वाटून काढा आणि त्याला एकत्र करा. हे द्रव्य हाताच्या साहाय्याने केसांवर लावा. यानंतर हलक्या हाताने केसांना मालिश करा. केसांच्या मुळापासून ते केसांच्या टोकापर्यंत कोरफड लावा. जवजवळ ३० ते ४५ मिनिटे कोरफडीचे द्रव्य केसांमध्ये राहू द्यावे, यामुळे केसांना पोषणतत्त्वांचा योग्य असा पुरवठा होईल. त्यानंतर तुमच्या शॅम्पू ने तुम्ही केस धुवू शकता.

कोरफडीचा केसांना नेमका फायदा काय?
यामुळे प्रामुख्याने केस गळती कमी होते. कोरफडी प्रोटियॉलिटिक एंझाइम्सचा समावेश असतो, ज्यामुळे कोरड्या केसांची समस्या देखील दूर होते. केसांची वाढ होते आणि केसगळती देखील कमी व्हायला मदत होते. कोरफडीमुळे कोड्याची समस्या सुद्धा नाहीशी होते . कोरफडीचा अ‍ॅलोव्हेरामध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल गुणधर्म असल्यामुळे डोक्यात कोंडा फार काळ टिकून रहात नाही. आणि केसांना नैसर्गिक अशी शाईन मिळते.


हे देखील वाचा Delivers Baby At Ram Mandir Station : रेल्वे स्टेशनवर तरूणाने केली महिलेची प्रसूती; व्हिडीओ कॉलवर डॉक्टरांनी केले मार्गदर्शन..

(वरील माहितीची आम्ही पुष्टी करत नाही.. केसांसारख्या अत्यंत संवेदशील गोष्टीबाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी सल्ला घ्यावा)

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या