Mumbai Municipal Corporation : मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना (Mumbai Municipal Corporation) दिवाळी हि यंदा चांगलीच गोड झाली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचारी (Mumbai Municipal Corporation) आणि अधिकाऱ्यांना ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झाला असून कर्मचाऱ्यान मध्ये आनंदच वातावरण आहे. यात महानगर पालिका अधिकारी आणि कर्मचारी, अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी, पालिका प्राथमिक शाळेतील आणि अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक, माध्यमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित आणि विनाअनुदानित), माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित आणि विनाअनुदानित),अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते आणि शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित आणि विनाअनुदानित), अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (अनुदानित आणि विनाअनुदानित) इत्यादींचा यात समावेश आहे.
दिवाळी २०२५ करता ३१ हजार रुपयांचा सानुग्रह अनुदान जाहीर करण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी घोषित केल्याने कर्मचाऱ्यांची यावर्षीची दिवाळी गोड झाली आहे.
सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV) यांना भाऊबीज भेट म्हणून रुपये १४,००० तर बालवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून रुपये ०५,००० भेट देण्याचा निर्णय देखील मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील (KDMC) कर्मचाऱ्यांना देखील दिवाळी बोनस जाहीर झाला आहे.. यंदा दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना २०,००० रुपये बोनस सुद्धा मिळणार आहे. सुरुवातीला शिवसेना शिंदे गटाकडून कर्मचाऱ्यांसाठी २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती ,मात्र आता शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी थेट आयुक्तांची भेट घेत बोनस संदर्भात चर्चा केली आहे. आयुक्तांनी २० हजार रुपयांचा बोनस निश्चित केल्याची अतिशय आनंददायी अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे. हा बोनस जाहीर झाल्याने केडीएमसीमधील कायम कर्मचारी, परिवहन कर्मचारी आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा बोनसच्या रकमेत वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
वसई विरार शहर महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड होणार आहे. आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिवाळीच्या सणांच्या मुहूर्तावर ३ हजार ६४० कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २२ हजार रुपयांनचा बोनस जाहीर केला आहे. यामध्ये पालिकेतील कायम स्वरुपी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत २ हजारांनी वाढ बोनसमध्ये करण्यात आली आहे. यामुळे ८ कोटी ८ लाखांचा भुर्दंड पालिकेच्या तिजोरीवर पडणार असल्याचं दिसून येत आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही दीपावली निमित्त बोनस जाहीर झाला आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी याची घोषणा देखील केली आहे. सागरी मंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रथमच बोनसचा लाभ मिळणार असून कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा सर्वाधिक १४ टक्के बोनस जाहीर झाला आहे. या वर्षात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ६९१ कोटींचा विक्रमी असा नफा झाला आहे. या नफ्याच्या रकमेतूनच हा दिवाळी बोनस दिला जाणार आहे. बँकेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा १० हजार रुपये इतका बोनस जाहीर केला आहे.
चिपळूण दुग्धोत्पादन क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी देखील यंदाची दिवाळी गोड असणार आहे. वाशिष्टी डेअरी उद्योग समूहाच्या वतीने संलग्न दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर झाला आहे . या निर्णयानुसार एकूण ५४२ शेतकऱ्यांना ४८ लाख ६५ हजार ७५४ रुपयांचा बोनस वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळीला सगळ्यांसाठीच खऱ्या अर्थाने गोड आहे असं म्हणावं लागेल.
हे देखील वाचा – Rahul Gandhi : बिहारमधील जागावाटपाचा गतिरोध सुटणार का? राहुल गांधींचा थेट लालू यादव यांना फोन..