Kedarnath Ropeway to Adani – भाजपा सत्तेत आल्यापासून देशातील बहुसंख्य मोठे आणि महत्वाकांक्षी प्रकल्प अदानी समुहाला दिले जात आहेत.
आता भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या उत्तराखंडमधील केदारनाथ धामचा रोपवे प्रकल्प देखील अदानी समूहाला देण्यात आला आहे. हा रोपवे २०३२ पर्यंत पूर्ण होणार असून, त्यामुळे ९ तासांचा प्रवास ३६ मिनिटांत करता येणार आहे.
या प्रकल्पामुळे भाविकांचा खडतर आणि वेळखाऊ प्रवास आता अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होणार आहे. सध्या सोनप्रयाग ते केदारनाथ हे सुमारे २१ किलोमीटरचे अंतर पायी पार करण्यासाठी ८ ते ९ तास लागतात.
मात्र, रोपवे सुरू झाल्यानंतर प्रवास अवघ्या ३६ मिनिटांत पूर्ण होईल. समुद्रसपाटीपासून तब्बल १२,००० फूट उंचीवर उभारला जाणारा हा प्रकल्प सुमारे ४,०८१ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार आहे.
या प्रकल्पाचे सर्वेक्षण अदानी समूह करणार आहे. याचे काम मार्च–एप्रिल २०२६ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा –
आमदार गायकवाडना झटका कॅन्टीनचे जेवण उत्तमच होते
मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड..
कैद्याला फाशी ऐवजी विषारी इंजेक्शन केंद्राचा पर्याय देण्यास विरोध का ? सुप्रीम कोर्टाचा सवाल