Home / क्रीडा / Test Twenty in Cricket : क्रिकेटमध्ये आला टेस्ट ट्वेंटी’ हा नवा प्रकार ; पारंपरिक कसोटीची गंभीरता आणि टी-२० चा संगम असणारा नवा फॉर्मेट..

Test Twenty in Cricket : क्रिकेटमध्ये आला टेस्ट ट्वेंटी’ हा नवा प्रकार ; पारंपरिक कसोटीची गंभीरता आणि टी-२० चा संगम असणारा नवा फॉर्मेट..

Test Twenty in Cricket : क्रिकेट (Cricket) वरच प्रेम हे देशात खोलवर रुजलेले आहे. आणि काळानुसार क्रिकेटमध्ये बऱ्याच गोष्टी देखील...

By: Team Navakal
Test Twenty in Cricket

Test Twenty in Cricket : क्रिकेट (Cricket) वरच प्रेम हे देशात खोलवर रुजलेले आहे. आणि काळानुसार क्रिकेटमध्ये बऱ्याच गोष्टी देखील बदलत आहेत. बऱ्याचदा नियमांमध्ये सुद्धा बदल केले गेले पण या सगळ्या बाबी जरी असल्या तरी क्रिकेटवरच प्रेम काही केल्या कमी होणार नाही. पण आता क्रिकेट प्रेमींना क्रिकेटचा (Cricket) एक नवीन फॉर्मेट बघायला मिळणार आहे. पुन्हा एकदा क्रिकेटच्या इतिहासात मोठा बदल होण्याची माहिती समोर आली आहे.

जवजवळ १५ मार्च १८७७ रोजी पहिला कसोटी सामना खेळण्यात आला. त्यानंतर वनडे हे नवीन स्वरूप आले. आणि मग उदयाला अली ती म्हणजे टी-२० जी आता प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यानंतर द हंड्रेड आणि टी-१० यांसारखे फॉर्मेट्स आले. आता क्रिकेटमधून अजून एक नवीन स्वरूप नवीन फॉर्मेट जोडला जाणार आहे. ‘टेस्ट ट्वेंटी’ असं या फॉर्मेटच नाव आहे.

नक्की काय आहे ‘टेस्ट ट्वेंटी’ फॉर्मेट? (What is Test Twenty?)

‘द फोर्थ फॉर्मेट’चे सीईओ आणि ‘वन वन सिक्स नेटवर्क’चे कार्यकारी अध्यक्ष गौरव बहिरवाणी यांच्या मते, या नवीन स्वरूपात आलेल्या फॉरमॅटचे नाव टेस्ट ट्वेंटी ठेवण्यात आले आहे. या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक संघाला दोनदा फलंदाजी करता येणारं आहे. अगदी टेस्ट मॅचप्रमाणेच, मात्र; हा सामना टेस्टसारखा दीर्घकाळ चालणार नसून अधिक वेगवान आणि थोडक्यात असेल. त्यामुळे प्रेक्षकांना या खेळात (शहारा) अर्थात रोमांचक अनुभवायला मिळेल. तसेच टीव्ही प्रेक्षकांनाही तो अधिक भावेल.

यामध्ये टेस्ट आणि टी-२० दोन्हींचे मिश्रण आहे. यातील काही नियम टेस्टमधून घेतले आहेत, तर काही टी-२० मधून, आणि त्यात आवश्यक ते बदल करण्यात केले आहेत. या सामन्याचा निकाल जिंकणे, हरणे, किंवा टाय आणि ड्रॉ अशा कोणत्याही स्वरूपात लागू शकतो, आणि हेच या खेळातील फॉरमॅटचे खास वैशिष्ट्य आहे.

यावर काही दिग्ज खेळाडूंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सध्या एबी डिव्हिलियर्स, क्लाइव्ह लॉयड, मॅथ्यू हेडन आणि हरभजन सिंग हे या फॉर्मॅटच्या सल्लागार मंडळाचा भाग आहेत. हा फॉर्मॅट अद्याप आंतरराष्ट्रीय स्तरावर लागू केलेला नाही. यावरती एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, “या फॉर्मॅटबद्दल सर्वात रोमांचक थ्रिल जाणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे खेळाडूंना मिळणारी मोकळीक आणि सर्जनशीलता. ‘टेस्ट ट्वेंटी’ खेळाडूंना स्वतःला व्यक्त करण्याची आणि कोणत्याही भीतीशिवाय मनसोक्त खेळण्याची संधी देते.

यानंतर मॅथ्यू हेडन यांनी सांगितले की, “युवा खेळाडू हे भारताचे भविष्य आहेत आणि म्हणूनच मी या फॉर्मेटमध्ये सहभागी झालो. दीर्घ फॉर्मॅट खेळाडूंच्या स्वभाव, कौशल्य आणि मानसिक-शारीरिक क्षमतेची खऱ्या अर्थाने परीक्षा घेतो. या नव्या फॉरमॅटमध्ये आपल्याला दोन्ही जगातील सर्वोत्तम गोष्टी मिळणार आहेत. यामध्ये एका दिवसात दोन डाव आणि एकूण 80 षटके होतील.” असे देखील ते म्हणाले.

हा ‘टेस्ट ट्वेंटी’ फॉर्मॅट क्रिकेटला एक नवीन स्वरूप द्यायला मदत करतो. जे स्वरूप प्रेक्षकांसाठी आणि पर्यायाने क्रिकेट प्रेमींसाठी रोमांचकारी ठरणार आहे. टेस्ट ट्वेंटी-२० मध्ये, एका दिवसात दोन वेगवेगळ्या डावांमध्ये एकूण ८० षटके खेळवली जातील. त्यामुळे भविष्यात हे सामने अतिशय रोमांचकारी ठरू शकतील यात काही शंकाच नाही.


हे देखील वाचा Shivajirao Kardile : भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या