ST Bus : एसटी प्रवास कारण्यारांसाठी आता रेल्वे प्रमाणेच आपल्या आपल्याला गरज असलेल्या एसटी बसचे लोकेशन अचूक मिळवता येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनमहामंडळाने अर्थात एसटीने यासाठी ‘आपली एसटी’ हे नवीन ॲप विकसित केले आहे. यासाठी बस ट्रॅकिंग सिस्टिम अशी एक नवीन सिस्टिम एसटी बसेसला बसवली जाणार आहे. राज्यात १२ हजारबसेसबरोबरच बीड जिल्ह्यातील ५०८ बसेसना बस ट्रॅकिंग सिस्टिम यंत्र बसवण्यात येणार आहे. आठवडाभरातच एसटीची ही सेवा ऑनलाइन रित्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे.
रोजमाल्टा ऑटोटेक लि. या कंपनीच्या सहकार्याने हे ॲप विकसित करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती आहे. या ॲपमुळे प्रवाशांना जवळच्या बसस्थानकांची माहिती अगदी सहज रित्या या ॲपवर उपलब्ध होणार आहे. बसचे वेळापत्रक तसेच थेट लाइव्ह ट्रॅकिंग देखील या ॲप द्वारे करता येणारआहे.

राज्यभरातील १ लाख मार्ग आणि १२ हजार बसची माहिती या ॲपमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळेप्रवाशांना तासंतास तात्काळ थांबावे लागणार नाही. याबरोबरच ह्या ॲपद्वारे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि मदतसुविधा देखील पुरवण्यात येणार आहे. ह्या उपयोग अर्थात अपघात किंवा संकटातही मदतकार्य मिळवण्यासाठी गरजेचे ठरणार आहे. ह्या ॲपवर कोणत्याही प्रकारचा शुल्क लावण्यात येणार नाही आहे.
या ॲपमध्ये चालक तसेच वाहक या दोघांचे संपर्क क्रमांक,याचबरोबर तिकिटाचे आरक्षण असल्यास एसटीचे लोकेशन जवळ आल्यावर प्रवाशांच्या मोबाईलवर संदेश मिळणार आहे. तिकीट आरक्षण केलेल्या बसचा क्रमांक आणि थेट माहिती मिळण्याची सोय देखील या ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे.
हे देखील वाचा – T20 World Cup 2026 : २०२६ टी-२० वर्ल्ड कपसाठी शेवटचा पात्र ठरलेला संघ कोणता?