Home / महाराष्ट्र / Gopichand Padalkar : पडळकरांच आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य; हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये..

Gopichand Padalkar : पडळकरांच आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य; हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये..

Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी हिंदू महिला आणि मुलींना जिममध्ये (Gym)जाऊ नये असे आवाहन करून...

By: Team Navakal
Gopichand Padalkar

Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी हिंदू महिला आणि मुलींना जिममध्ये (Gym)जाऊ नये असे आवाहन करून नवीन वाद निर्माण केला आहे. त्यांनी घरीच योगा करावा असे म्हटले आहे.

एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना पडळकर यांनी एका मेळाव्यात सांगितले की, जिम ही एका “रॅकेट”चा भाग आहे आणि महिलांना जिम प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवू नये असा इशारा दिला. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.

“ही जिम म्हणजे एक मोठं रॅकेट आहे. तुम्हाला सर्वांना ते माहित नाही,” हिंदू महिलांना घरी योगाभ्यास करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

“मी हिंदू समुदायातील सगळ्या मुली आणि महिलांना विनंती करतो , कृपया जिममध्ये जाऊ नका. गरज पडल्यास घरी योगा करा. तुम्हाला प्रशिक्षक किंवा जिम कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी माहित नाही. किमान आधी ते पडताळून पहा.”

त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली आटीकेची झोड उठली आहे. आतापर्यंत, भाजप किंवा पडळकर यांनी स्वतः यावर कोणतेही स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही.

सांगली येथील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांच्या ज्वलंत भाषणांसाठी तर ओळखले जातात. अनेकदा संवेदनशील सामाजिक आणि धार्मिक मुद्द्यांवर त्यांची विधाने वादग्रस्त ठरले आहेत.


हे देखील वाचा Ravindra Jadeja’s Wife Rivaba : रिवाबा जडेजा थेट मंत्रिमंडळात; घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या