Manoj Jarange VS Chhagan Bhujbal : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange )यांनी ओबीसी (OBC) नेत्यांच्या भूमिकेवर तीव्र शब्दात टीका केली आहे. ते म्हणतात ‘तुम्ही जेव्हा तुरुंगातून बाहेर आलात, तेव्हा मराठा समाजानेच तुम्हाला आर्थिक पाठबळ दिल. सुप्रिया सुळेंनी तुम्हाला २० कोटी रुपये दिले, तेव्हा तुम्ही अन्न-पाण्याला लागलात, अन्यथा तुम्हाला पुन्हा भाजीच विकावी लागली असती,’ अशी घणाघाती टीका जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर केली.
तुमचा इतिहास आम्हाला वेगळा सांगण्याची गरज नाही-
ओबीसी नेत्यांना उद्देशून बोलताना जरांगे म्हणाले, “तुमचा इतिहास आम्हाला वेगळा सांगण्याची गरज नाही. तुम्हाला आम्ही मोजीत देखील नाही.” ते पुढे म्हणतात की, “तुम्हाला कोणी सांगितले की ते ओबीसी नेते आहेत म्हणून? ते फक्त एका विशिष्ट जातीचे नेते आहेत आणि त्यांच्या आजच्या मोर्चात एका विशिष्ट जातीचेच लोक देखील सहभागी होणार आहेत. ते खरे ओबीसीचे शत्रू आहेत,” अशी परखड टीका जरांगे यांनी केली.
काही ओबीसी नेत्यांच्या पूर्वीच्या राजकीय आणि व्यक्तिगत जीवनावर टीका करताना पुढे ते म्हणतात “बरं झालं तुम्ही शाळेत गेला आणि बाकीचे शाळेत जात नव्हते. बराच काळ जेलमध्येसुद्धा होतात, हा माणूस ओबीसीला महापापी लागला आहे.” आरक्षणाला विरोध करणाऱ्या याच नेत्यांमुळे ओबीसी समाजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
हे देखील वाचा – Akola Clash : गोमांस विक्रीवरून दोन गटात राडा; अकोल्यात तणावाचे वातावरण..