Home / महाराष्ट्र / Kirit Somaiya:मशिदींवरील भोंगे मी काढले! माझाच लढा! किरीट सोमय्यांचा अजब दावा

Kirit Somaiya:मशिदींवरील भोंगे मी काढले! माझाच लढा! किरीट सोमय्यांचा अजब दावा

Kirit Somaiya– मशिदींवरील भोंगे हटवले जावे म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मनसेने केलेल्या तीव्र आंदोलनानंतर...

By: Team Navakal
somyya

Kirit Somaiya– मशिदींवरील भोंगे हटवले जावे म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मनसेने केलेल्या तीव्र आंदोलनानंतर अनेक मशिदींवरील भोंगे पोलिसांनी काही महिन्यांपूर्वीच हटविले तर काही मशिदींनी अधिकृत परवानगी घेतली आणि भोंग्यांचा आवाज कमी केला. हा इतिहास ताजा असताना मशिदींवरील भोंगे मीच काढले आणि माझ्यामुळे मुंबई भोंगेमुक्त झाली, असा अजब दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज केला आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांनी याबाबत काहीच केले नाही, त्यांनी केवळ भाषणे केली असेही किरीट सोमय्या ( Kirit Somaiya)बोलले.


राज ठाकरे यांनी 2022 साली भोंग्यांचा मुद्दा उचलला होता. नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना राज यांनी वरळी मतदारसंघातील प्रचार सभेत सत्ता हातात आल्यास मशिदींवरील भोंगे काढू, अशी घोषणा केली. त्यानंतर त्यांच्या पक्षाने यासाठी पुन्हा आक्रमक आंदोलने केली. या आंदोलनांमुळे पोलिसांनी मुंबईतील बहुसंख्य मशिदींवरील भोंगे हटविले. काही भोंग्यांचे आवाज कमी झाले. मशिदींनी भोंग्यासाठी अधिकृत परवानगी घेतली. मात्र भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज कमाल केली. त्यांनी थेट ‘भोंगेमुक्त मुंबई’ असे पुस्तक लिहिले. हे पुस्तक आज प्रकाशित केले. यात भोंग्यांचा विषय आपणच मार्गी लावला असल्याचा दावा केला. यावेळी आशिष शेलार यांनी सोमय्या यांचे तोंडभरून कौतुक केले.


या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलताना सोमय्या यांनी म्हटले की, या विषयावर मी न्यायालयीन लढाई लढलो, 67 पेक्षा अधिक पोलीस स्टेशनना भेटी देऊन त्यांच्या परिसरातील मशिदींवरील भोंगे काढण्यास भाग पाडले. मला मशिदीत जाऊन कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यापासून रोखा, अशी आवाहने उद्धव ठाकरेंसह विरोधकांनी केली. मात्र तरीही मी सातत्यपूर्ण संघर्ष करीत 7 हजारांहून अधिक भोंगे मशिदींवरून उतरविण्यास भाग पाडले. मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम, भाजपा नेते व मंत्री आशिष शेलार यांनी आपल्या भाषणात त्यांचा हा दावा उचलून धरीत त्यांनाच ‘भोंगेमुक्त मुंबई’चे श्रेय दिले. या पुस्तकात भोंगे हटविण्यात आलेल्या मशिदींचे व काही मशिदींसमोर सोमय्या उभे असल्याची छायाचित्रे आहेत.


उद्धव-राज यांनी मुंबईसाठी काय केले? भाजपाचा सवाल


भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या ‘भोंगेमुक्त मुंबई’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी भाजपाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर जास्त हल्ला चढविला. मुंबईच्या विकासासाठी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी काय केले हे सांगावे, असा सवाल राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विचारला. ‘भोंगेमुक्त मुंबई’ म्हणजे मतांच्या लांगूलचालनासाठी रंग बदलणार्‍यांना चपराक आहे, अशा शब्दांत भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. किरीट सोमय्या यांच्या लढ्यामुळे मुंबईतील मशिदींवरील भोंगे हटल्याचे सांगत भाजपामुळेच आज मुंबई भोंगेमुक्त झाली, असे शेलार व साटम यांनी सांगितले. उद्धव ठाकरे हे देशद्रोही असल्याचे रंगवले गेले.


वांद्रे हिंदू असोसिएशन सभागृहात आयोजित या पुस्तकाचे प्रकाशन शेलार व साटम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना या तीनही नेत्यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेत‘उबाठा’ला लक्ष्य केले. उद्धव व राज ठाकरेंनी शिवतीर्थावर भाषण करीत ‘भोंगेमुक्त मुंबई’ करण्याचा शब्द अनेकवेळा दिला. मात्र ते प्रत्यक्ष भोंगे हटवू शकले नाहीत. उलट टिळक भवनाकडे (काँग्रेस मुख्यालय) त्यांच्या भोंग्याची दिशा वळताच त्यांची भूमिका बदलली.


उद्धव ठाकरेंनी या प्रश्नी काय केले? आम्ही ‘भोंगेमुक्त मुंबई’ करीत असताना उद्धव ठाकरे हे मुंबईला हिरवायुक्त करायला निघाले तर लांगूलचालन करणार्‍या काँग्रेससारख्या पक्षासोबत मांडीला मांडी लावून राज ठाकरे बसले, अशी टीका शेलार यांनी केली. सोमय्या यांच्या लढ्यामुळे मुंबईतील मशिदींवरील 7 हजारांहून अधिक भोंगे उतरवले, असे सांगत सोमय्या हे संघर्षयोद्धा असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना साटम म्हणाले की भाजपचा कोणत्याही धर्माला विरोध नाही. मात्र एखाद्या विशिष्ट धर्माला ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळण्यातून सूट दिली जाणार नाही. मुंबईच्या विकासात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अनेक उपक्रमांसह भर घातली आहे. भोंगामुक्त मुंबई हाही फडणवीस सरकारने घेतलेला क्रांतिकारी निर्णय आहे, असेही
ते म्हणाले.

अवघ्या 1 किमीवर मशिदीतून आवाज


हा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला त्या ठिकाणापासून अवघ्या 1 किमी अंतरावर वांद्रे स्थानक असून, या स्थानकाला लागूनच मशीद आहे. या मशिदीवर बाहेरून भोंगे दिसत नसले तरी या मशिदीतील भोंग्याचा आवाज 100-200 मीटरच्या परिसरात अगदी एस. व्ही. रोडवरील  लकी रेस्टॉरंटपर्यंत स्पष्टपणे ऐकू


हे देखील वाचा 

असुरक्षितता! स्वेच्छानिवृत्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष; मध्य रेल्वेच्या लोको रनिंग कर्मचाऱ्यांचे आंदोलन

 उद्धव ठाकरे दिवाळीनंतर मराठवाडा दौऱ्यावर जाणार

रेल्वेची तिकीट बूकिंग वेबसाईट पुन्हा ठप्प

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या