Afghanistan Pakistan War: पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या 3 अफगाण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. क्रिकेटपटूंच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) मोठा निर्णय घेत, आगामी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासोबतच्या त्रिकोणी T20 मालिकेतून माघार घेण्याची घोषणा केली आहे.
सोशल मीडियावर निवेदन जारी करत ACB ने या घटनेचा निषेध केला आणि याला “पाकिस्तानी राजवटीने केलेला भ्याड हल्ला” असे म्हटले आहे. ही मालिका 5 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत लाहोर आणि रावळपिंडी येथे नियोजित होती.
Afghanistan Pakistan War: 3 क्रिकेटपटूंसह 8 जणांचा मृत्यू
निवेदनात ACB ने सांगितले की, या हृदयद्रावक घटनेत उरगुन जिल्ह्यातील तीन खेळाडूआणि अन्य 5 देशवासी शहीद झाले, तर सात जण जखमी झाले.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार राशिद खान यानेही या “क्रूर” हवाई हल्ल्यांचा तीव्र निषेध करत ACB च्या माघार घेण्याच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. त्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “या शोकांतिकेमुळे महिला, मुले आणि देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण क्रिकेटपटूंचे प्राण गेले. नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे पूर्णपणे अनैतिक आणि क्रूर आहे.”
Afghanistan Pakistan War: वाढत्या तणावामुळे खेळावर परिणाम
11 ऑक्टोबर रोजी अफगाण सैन्याने कथितरीत्या पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. यानंतर 48 तासांची तात्पुरती युद्धबंदी झाली होती, पण पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील आर्गून आणि बरमल जिल्ह्यांमध्ये ड्युरंड रेषेजवळ निवासी भागांना लक्ष्य करून हवाई हल्ले केल्याचा आरोप झाल्यानंतर ही युद्धबंदी तुटली.
ACB ने स्पष्ट केले की, हे खेळाडू एका मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात भाग घेण्यासाठी पक्तिका प्रांताची राजधानी शाराना येथे गेले होते आणि घरी परतत असताना त्यांना लक्ष्य करण्यात आले. या दुःखद घटनेच्या निषेधार्थ आणि पीडितांना आदर व्यक्त करण्यासाठी पाकिस्तानसोबत होणाऱ्या T20I मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय ACB ने घेतला आहे.
Three cricketers — Kabeer, Sibghatullah, and Haroon — and five others from Urgun District, Paktika Province, were killed in a attack by the Pakistani regime. Seven others were injured.
— Cricketopia (@CricketopiaCom) October 18, 2025
In honor of the victims, the ACB has decided to withdraw from the upcoming Tri-Nation T20I… pic.twitter.com/rZIRFqD3GC
PCB आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला झटका
अफगाणिस्तानच्या माघारीमुळे पाकिस्तानच्या घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नांना मोठा फटका बसला आहे. भारताने 2012-13 पासून पाकिस्तानसोबतची द्विपक्षीय मालिका आधीच थांबवली आहे.
यापूर्वी सप्टेंबरमध्ये आशिया चषक दरम्यान भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते, तेव्हा भारतीय खेळाडूंनी मॅचनंतर हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याचे प्रकार घडले होते.
हे देखील वाचा – Rohit Sharma: 2027 चा वर्ल्ड कप खेळणार का? चाहत्यांच्या प्रश्नावर रोहित शर्मा म्हणाला…