Diwali Diabetes Health Tips: दिवाळीच्या काळात सर्वत्र गोडधोड आणि फराळाची चंगळ असते. मात्र, मधुमेह (डायबिटीस) असणाऱ्यांसाठी हा काळ त्यांच्या आहाराच्या शिस्तीची खरी परीक्षा घेणारा असतो.
सणाचा आनंद लुटताना रक्तातील साखर वाढणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेही रुग्ण गोड खाऊ शकतात, पण त्यासाठी काही स्मार्ट युक्त्या आणि अत्यंत कठोर ‘पोर्शन कंट्रोल’ (Portion Control) गरजेचा आहे.
Diwali Diabetes Health Tips: गोड खाताना या गोष्टी लक्षात ठेवा:
- वेळेचे नियोजन : गोड पदार्थ कधीही उपाशी पोटी खाऊ नका. नेहमी मुख्य जेवण (दुपारचे किंवा रात्रीचे जेवण) घेतल्यानंतर लगेच गोड पदार्थाचा एक छोटा तुकडा खावा. जेवणातील प्रथिने (Protein) आणि फायबरमुळे (Fiber) ग्लुकोज शोषणाची प्रक्रिया थोडी मंदावते.
- पर्यायी गोडवा : मिठाई बनवताना किंवा विकत घेताना पांढऱ्या रिफाइंड साखरेऐवजी खजूर, अंजीर, गूळ (किमान प्रमाणात) किंवा एरिथ्रिटॉल/स्टीव्हिया यांसारख्या नैसर्गिक किंवा कृत्रिम गोड पदार्थांचा वापर करा.
- तळलेल्या पदार्थांपासून अंतर: मैद्याचे आणि तळलेले पदार्थ (जसे की, बेसनाच्या सेव, शंकरपाळी, विकतचा फरसाण) टाळावेत. त्याऐवजी ओव्हनमध्ये बेक केलेले किंवा भाजलेले स्नॅक्स, तसेच उच्च फायबर असलेले गहू, बाजरी किंवा नाचणीचे पदार्थ निवडावेत.
- पाण्याचे महत्त्व: गोड पदार्थ, सोडा किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स पूर्णपणे टाळा. दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि रक्तातील अतिरिक्त साखर शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते.
डायबेटीस असणाऱ्यांनी कोणते पदार्थ टाळावे?
- साखरेच्या पाकात घोळवलेले पदार्थ (उदा. गुलाबजाम, रसगुल्ला,).
- मैद्याचा वापर केलेले आणि तूप किंवा तेलात तळलेले फराळाचे पदार्थ.
- रिफाइंड साखर आणि जास्त फॅट यांचा मिलाफ असलेले पदार्थ (उदा. खूप तूप असलेले लाडू, खवा मिठाई).
शुगर लेव्हल नियंत्रण (Target Sugar Levels):
मधुमेही रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिवाळीत रक्तातील साखरेची पातळी नियमित तपासावी. जेवणाआधी (Fasting) 80 ते 130 mg/dL आणि जेवणानंतर (2 तास) 180 mg/dL पेक्षा कमी साखर असणे हे सामान्यतः चांगले मानले जाते. HbA1c (मागील तीन महिन्यांची सरासरी) 7.0 टक्क्यांपेक्षा कमी राखण्याचे ध्येय असावे.
Diwali Diabetes Health Tips: महत्त्वाच्या टिप्स:
व्यायाम किंवा चालणे सणाच्या निमित्ताने थांबवू नका. गोड खाल्ल्यानंतर किमान 30 मिनिटे चालणे फायदेशीर ठरते. औषधे, गोळ्या किंवा इन्सुलिनचे डोस वेळेवर घ्यायला विसरू नका.
हे देखील वाचा – Scholarship Exam: शिष्यवृत्ती परीक्षा आता चौथी आणि सातवीसाठी; जाणून घ्या नवे नियम