ST Bus News : राज्यात बऱ्याच ठिकाणी नूतनीकरणाचे नारे लागले जातात पण खरच हे नूतनीकरण होत का? राज्यात एकीकडे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी त्यांच्या शासकीय निवासस्थानांच्या नूतनीकरणावर (Renovation) लाखो रुपये खर्च करताना दिसतात. आणि दुसरीकडे सरकार (GOVT) च्या जाहिराती यावर लागणारा पैसा याच सखोल ज्ञान आता पर्यंत महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रत्येक माणसाला असेलच. आगामी निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना गाजर देण्याचं काम सरकार करतय का असे प्रश्न देखील आता मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत आहेत.
ग्रामीण भागाची लाइफलाइन असलेली ‘लालपरी’ (MSRTC Bus) मात्र अत्यंत दयनीय अवस्थेत धावत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. पुण्यातील ओतूर–नारायणगाव मार्गावर धावणाऱ्या एका एसटी बसची अत्यंत दयनीय अवस्था झालेली दिसत आहे. या एसटी बसला चक्क दरवाजाच (Door) नाही, तरीही प्रवाशांचा जीव धोक्यात घालून ही बस वाहतूक करत आहे.
या एसटी बसच भयावह असं वास्तव दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. यामध्ये एसटीचालक बस चालवत असताना त्याच्या बाजूचा, म्हणजेच बसचा मुख्य दरवाजा पूर्णपणे निखळल्याचे (Detached) या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. या अश्या गोष्टींमुळे मोठी दुर्घटना होण्याची जास्त शक्यता असते.
या व्हिडीओमूळे प्रसार माध्यमांवर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. या सगळ्या प्रकारामुळे सामान्य जनतेच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. लाला परी हि प्रत्येक ग्रामीण शहरी भागातील लोकांची जीवनदायी आहे. जिच्यावर इतके वर्ष ग्रामीण आणि शहरी लोक तिच्यावर अवलंबून आहेत. त्या लाल परीची वाताहत होताना उघड्या डोळ्याने पाहावं लागत आहे.
कुठे नेऊन ठेवलाय लालपरीचा दरवाजा? मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री साहेब जनतेचा जीव एवढा स्वस्त आहे का?#MSRTC #Pune #लालपरी pic.twitter.com/OKRkosD5kG
— Gangappa Pujari (@GangappaPujar07) October 17, 2025
एसटी चालवताना विशेषतः वळणावर किंवा समोरून येणाऱ्या वाहनाच्या धोक्यापासून वाचन्यासाठी कोणत्याही प्रकारचं सौरक्षण या गाडीला मिळत नाही आहे. ग्रामीण भागातील बहुतांश लोक हि एसटीवरच अवलंबून असतात, यात वृद्ध शाळेत किंवा कॉलेजला जाणारी मूल यांचा देखील समावेश असतो. महामंडळाच्या जीर्ण बस अश्याच रस्त्यावर धावत राहिल्या तर भविष्यात मोठ्या अपघाताला तोंड द्यावं लागेल.
हे दृश्य शासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण असल्याचं देखील बोललं जात आहे. ही बस नारायणगाव डेपोची असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर एसटीच्या दुरावस्थेबद्दल तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे. प्रवास करण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो, अशी प्रवाशांची तक्रार आहे.
राजकीय नेत्यांची सुरु असलेली चैन आणि सामान्य नागरिकांची रोजची होणारी परवड यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. सामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचे साधन असलेल्या एसटी बसकडे मात्र प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. ग्रामीम भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी अशा दयनीय अवस्थेत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षे बाबत मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे देखील वाचा – निम्म्या किंमतीत मिळतोय Samsung Galaxy A35 5G स्मार्टफोन; दमदार कॅमेरा-पॉवरफुल बॅटरीसह मिळतील खास फीचर्स