Home / महाराष्ट्र / Vijay Wadettiwar : भुजबळांच्या आरोपांना वडेट्टीवारांचे सडेतोड उत्तर…

Vijay Wadettiwar : भुजबळांच्या आरोपांना वडेट्टीवारांचे सडेतोड उत्तर…

Vijay Wadettiwar : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chaggan Bhujbal) यांनी कालच्या ओबीसी एल्गार मेळाव्यातून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)...

By: Team Navakal
Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chaggan Bhujbal) यांनी कालच्या ओबीसी एल्गार मेळाव्यातून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर जोरदार टीका केली. एक व्हिडिओ दाखवत वडेट्टीवार(Vijay Wadettiwar)कसे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगेंची बाजू घेत आहेत असा दावा देखील भुजबळ यांनी केला. यावरून आज विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत भुजबळांना चांगलंच सुनावलं आहे. त्यामुळे ओबीसींमध्येच फूट पडल्याचं दिसून येत आहे.

विजय वडेट्टीवार म्हणतात, ओबीसींना आरक्षण मिळवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करावे लागेल. काहीही संबंध नसताना भाजपच्या इशाऱ्यावर भुजबळांनी मला लक्ष्य केले असा आरोप देखील या वेळी वडेट्टीवार यांनी केला आहे. माझ्या नागपुरच्या मेळाव्यात प्रचंड गर्दी झाली होती. ही गर्दी पाहून भाजप घाबरल आहे. मला लक्ष्य करून जर ओबीसींना न्याय मिळणार असेल किंवा २ सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द केला जाणार असेल तर मी भुजबळांच्या पाया पडेन आणि त्यांचे आशीर्वाद सुद्धा घेईन. भुजबळांच्या पाया पडून भुजबळांना सांगेन तुम्ही जी लढाई लढाल त्या लढाईत मी असेन, असं देखील विजय वडेट्टीवार म्हणाले.

कालच्या सभेत माझा व्हिडिओ दाखवून भुजबळांना नेमक काय साध्य करायचं आहे? अंबडच्या सभेत कोयता काढण्याची भाषा करण्यात आली.आरक्षणाच्या लढाईत कोयता काढून आरक्षण मिळणार आहे का? आपल्याला जे मिळवायचं आहे ते संवैधानिक मार्गाने शांतपणे मिळवलं पाहिजे. मंत्रिमंडळात यासाठी भांडावं लागेल. असं कोयता, तलवारी काढून काही साध्य होणार नाही. अंबडच्या सभेत कोयता काढण्याची भाषा झाली होती. त्यामुळे तिथपासून त्यांच्या कोणत्याच सभेला गेलो नाही. पंढरपूरच्या सभेला मला त्यांनी बोलावलं नव्हतं. आणि काल मतदारसंघात कार्यक्रम असल्याने मी कालच्या सभेला जाऊ शकलो नाही असं वडेट्टीवार म्हणाले.

वडेट्टीवार पुढे म्हणतात जरांगेचा विषय काढायची काहीच गरज न्हवती. नागपूरचा अफाट मोर्चा पाहिल्यावर भाजपला आमची भीती वाटायला लागली. त्यामुळे आपल्या फेक नॅरेटिव्हच्या फॅक्ट्रीतील एका नेत्याला पुढे करून मला टार्गेट करण्याचं काम आता केलं जात आहे. त्याबद्दल मी भुजबळ साहेबांचे मनापासून आभार मानतोय. असा टोला हि त्यांनी भुजबळांना लावला.


हे देखील वाचा – Rohit Sharma: 2027 चा वर्ल्ड कप खेळणार का? चाहत्यांच्या प्रश्नावर रोहित शर्मा म्हणाला…

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या