Mahesh Manjrekar– एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट एलएलपी (Everest Entertainment LLP) या चित्रपट निर्मिती कंपनीने मुंबईत उच्च न्यायालयात प्रख्यात अभिनेते-निर्माता महेश वामन मांजरेकर आणि ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ (‘Punha ShivajiRaje Bhosale)या आगामी मराठी चित्रपटाच्या इतर निर्मात्यांविरोधात दावा दाखल केला आहे. बंधनकारक अशा कायदेशीर कराराचे उल्लंघन केल्याचा, कॉपीराइटसंबंधी बाबींचे उल्लंघन केल्याचा तसेच जनतेची दिशाभूल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचा आरोप या दाव्यात करण्यात आला आहे.
२००९ आलेल्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ (‘Mi ShivajiRaje Bhosale Boltoy)च्या मालकी हक्कांशी आणि बौद्धिक संपदा हक्कांशी संबंधित हा कायदेशीर वाद आहे. या चित्रपटाची मूळ निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेन्मेट एलएलपी आणि महेश मांजरेकर यांनी संयुक्तपणे मेसर्स अश्वमी फिल्म्सच्या बॅनरखाली केली होती आणि त्यात एव्हरेस्टकडे चित्रपटाचे ६० टक्के आणि महेश मांजरेकर यांच्याकडे ४० टक्के हक्क होते.
२०१३ मध्ये श्री महेश मांजरेकर यांनी आर्थिक मोबदला घेवून त्यांचे ४० टक्के हक्क हे पूर्णतः एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटला हस्तांतरित केले. त्यामुळे एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट ही कंपनी या २००९ साली आलेल्या चित्रपटाशी संबंधित सर्व बौद्धिक संपदा हक्कांची एकमेव आणि संपूर्ण मालक बनली. त्यात प्रीक्वेल, सिक्वेल किंवा इतर मूळ विषयाशी संबंधित कलाकृती तयार करण्याच्या विशेष आणि एकाधिकार हक्कांचा समावेश आहे. मात्र, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा २००९ साली आलेल्या चित्रपटाचा पुढील भाग किंवा भाग २ आहे असे उल्लेख चित्रपटाचे नाव, लोगो आणि पोस्टर डिझाइनमध्ये करण्यात आला आहे.
या सर्व गोष्टी मूळ चित्रपटाशी साधर्म्य सांगणाऱ्या आहेत. प्रसिद्धी साहित्य, मुलाखती आणि बातम्या यामध्येही ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा उल्लेख २००९च्या मूळ चित्रपटाचा ‘भाग २’ म्हणून करण्यात आला आहे. हा प्रकार मूळ चित्रपटाच्या प्रतिष्ठेचा आणि लोकप्रियतेचा फायदा घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. त्यामुळेच, एव्हरेस्टने आपल्या कॉपीराइट (copyright)आणि ब्रँड मूल्याचे संरक्षण करण्यासाठी हा दावा दाखल केला, असे एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने म्हटले आहे.
मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court)सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, माननीय उच्च न्यायालयाने नव्या चित्रपटाच्या निर्मात्यांना एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटसाठी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन (स्क्रीनिंग) आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. हे प्रदर्शन २० ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे.
हे देखील वाचा –
सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकासासाठी ‘एनओसीची’ गरज नाही
जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात हायकोर्टात याचिका
भारतात होणाऱ्या T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये कोणते 20 संघ खेळणार? वाचा संपूर्ण यादी