Karmala Crime : करमाळा तालुक्यातील साडे गावात ऋषिकेश लोंढे (१४) या अल्पवयीन मुलाच्या मृत्यूनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि याच वरून ठिय्या आंदोलन केले गेले.
करमाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी मृताच्या नातेवाईकांना आणि तसेच गोरक्ष दलाचे नेते यांना समजावून सांगण्याचा अतोनात प्रयत्न केला. मृतदेहावर अंत्यसंस्कार करून घ्या, पुढील कारवाई आम्ही करत आहोत, असे देखील सांगितले. मात्र, मृताचे नातेवाईक आणि गोरक्ष दलाचे नेते यांनी गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही, असा कठोर पवित्रा घेतला. अखेर पोलिसांनी रात्री उशिरा दिपक लोंढे यांच्या फिर्यादीनुसार ७ संशयित आरोपी विरुद्ध मुलाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दमदाटी करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मिरताज कुरेशी, सलमान उर्फ मामा शेख, आझाद शेख, शाहरुख कुरेशी, निजाम कुरेशी, मिराज कुरेशी, अफजल कुरेशी (सर्व रा. साडे, ता. करमाळा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत.
याप्रकरणी फिर्याद दिपक काशीनाथ लोंढे (वय ३६, रा. साडे, ता. करमाळा) यांनी करमाळा पोलिसांन मध्ये दिली आहे. हा प्रकार सात ऑक्टोबर रोजी अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोरच घडला होता.
या घटनेत खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, अशी समजूत देखील पोलिस निरीक्षक माने यांनी नातेवाईक व गोरक्ष दलाचे नेते यांना घातली. मात्र मृताचे नातेवाईक आणि गोरक्ष दलाचे नेत्यांनी गुन्हा दाखल करण्याचा अट्टहास धरला. या परिस्थितीत तणाव वाढू नये, म्हणून पोलिसांनी वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करत करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
हे देखील वाचा – Rohit Sharma: 2027 चा वर्ल्ड कप खेळणार का? चाहत्यांच्या प्रश्नावर रोहित शर्मा म्हणाला…